Rishabh Pant Update Team India : भारतीय संघाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. ऋष पंत दुखापतीमधून सावरला असून नेटमध्ये कसून सराव करत आहे.  भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने ऋषभ पंतबाबात मेडिकल अपडेट दिले आहे. ऋषभ पंत याने नेट्समध्ये फलंदाजीचा सराव सुरु केला आहे, त्यासोबतच तो विकेटकीपिंगही करत आहे.  ऋषभ पंत याचे फिटनेस अपडेट मिळाल्यानंतर चाहत्यांना पुनरागमनाची आपेक्षा वाढली आहे. ऋषभ पंत विश्वचषकात खेळणार का ? असा सवाल चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. मायदेशात होणाऱ्या विश्वचषकात ऋषभ पंत खेळणार की नाही, हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल. ऋषभ पंतच्या फिटनेसमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. तो फलंदाजी आणि विकेटकिपिंगही करत आहे. 


बीसीसीआयने ऋषभ पंत याच्या फिटनेसबाबत माहिती दिली. यामध्ये बीसीसीआयने म्हटले की,  'ऋषभ पंतसाठी खास ट्रेनिंग प्रोग्राम डिझाइन करण्यात आला आहे. त्यामध्ये त्याची स्ट्रेंथ आणि रनिंगवर काम केले जात आहे. यामुळे पंतला मैदानात पुनरागमन करण्यासाठी मदत मिळेल. ऋषभ पंत याने  नेट्समध्य फलंदाजीचा सराव सुरु केला आहे. ' सोशल मीडियावर ऋषभ पंतचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये तो फलंदाजी आणि विकेटकिपिंग करताना दिसत आह. त्यातच बीसीसीआयकडूनही माहिती देण्यात आली आहे. ऋषभ पंत विश्वचषकात खेळणार की नाही, अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरु झाली आहे.  काही चाहत्यांनी ऋषभ पंत लवकरच पुनरागमन करणार असल्याचे म्हटलेय. काहींनी विश्वचषकाच्या भारतीय संघाचा  ऋषभ पंत भाग असेल, असा अंदाज वर्तवला आहे. भारतात होणाऱ्या विश्वचषकाचा ऋषभ पंत भाग असेल की नाही, याबाबत आताच काही सांगणं कठीण आहे. विश्वचषकाआधी भारतीय संघ आशिया चषक आणि आर्यलँड दौऱ्यावर जाणार आहे.


दरम्यान, बीसीसीआयने ऋषभ पंत याच्यासोबत जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्या फिटनेसचेही अपडेट दिले आहे. या सर्व खेळाडूंनी नेट्समध्ये सराव सुरु केला आहे.  बुमराह आणि कृष्णा जवळपास फिट झाले आहेत. ते  फूल स्ट्रेंथमध्ये गोलंदाजी करत आहेत. एनसीएमध्ये आयोजित सराव सामन्यानंतर दोघांच्या फिटनेसबाबात निर्णय घेतला जाणार आहे. केएल राहुल आणि श्रेयस अय्यरही दुखापतीमधून सावरले आहेत. लवकरच ते भारतीय संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. बुमराह आयर्लंड दौऱ्यातून कमबॅक करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.