India VS Australia Test in Adelaide : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 22 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. पर्थमध्ये उभय संघांमध्ये पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ पहिल्या डावात अवघ्या 150 धावांत गडगडला. प्रत्युत्तरात पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत यजमान ऑस्ट्रेलियाने 27 षटकांत 7 गडी गमावून 67 धावा केल्या होत्या. आता दुसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियाला सर्वबाद करण्याचा प्रयत्न करतील.




दरम्यान, एक मोठी बातमी समोर येत आहे. खरंतर, पर्थ कसोटीनंतर टीम इंडियाचा सामना ॲडलेडमध्ये डे-नाईट टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या सामन्याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मोठा निर्णय घेतला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने माजी क्रिकेटपटू फिलिप ह्युजेस यांच्या दुःखद निधनाच्या 10 व्या स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 6 डिसेंबरपासून ॲडलेड येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी त्याला श्रद्धांजली अर्पण करतील.  




क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतला मोठा निर्णय 


ऑस्ट्रेलियासाठी 26 कसोटी सामने खेळणाऱ्या ह्यूजचा 2014 मध्ये मैदानावर घरच्या सामन्यादरम्यान बाऊन्सर बॉल लागल्याने त्याचा मृत्यू झाला होता. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या सामन्यादरम्यान गोलंदाज सीन ॲबॉटच्या बाऊन्सरने त्याच्या डोक्याला मार लागला होता. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी त्यांच्या स्मरणार्थ एक मिनिट मौन पाळण्यात येणार आहे.


उल्लेखनीय आहे की बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या दृष्टिकोनातून ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत मालिका काबीज करण्याकडे दोन्ही संघांचे लक्ष असेल.




हे ही वाचा -


IND vs AUS 1st Test: जसप्रीत बुमराहनं ऑस्ट्रेलियाला पाणी पाजलं, 4 विकेट घेत डावाला सुरुंग लावला, भारताला मॅचमध्ये परत आणलं 


Ind vs Aus 1st Test Day-1 : 217 धावा अन् तब्बल 17 विकेट! पर्थच्या मैदानावर बड्या फलंदाजांचं पानिपत, पहिल्याच दिवशी नेमकं काय घडलं?