Rishabh Pant Stump Mic Kuldeep Yadav Video : भारताने 19 सप्टेंबरपासून बांगलादेश विरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी त्यांचा 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे, ऋषभ पंत जवळपास 20 महिन्यांनंतर कसोटी संघात परतला आहे. 


डिसेंबर 2022 मध्ये मीरपूर येथे बांगलादेशविरुद्ध दुसरी आणि अंतिम कसोटी खेळल्यानंतर काही दिवसांनी 30 डिसेंबर रोजी पंतचा अपघातात झाला होता. त्यानंतर त्याने या वर्षीच्या आयपीएलमधून क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. तर 26 वर्षीय स्फोटक फलंदाजाने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतून राष्ट्रीय संघात पुनरागमन केले.


दरम्यान, भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत सध्या दुलीप ट्रॉफीमध्ये व्यस्त आहे, जिथे तो अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वाखाली भारत ब संघाचा एक भाग आहे. त्यांच्या संघाने रविवारी बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत अ संघाचा 76 धावांनी पराभव केला. पंत नेहमी मजेशीर मूडमध्ये असतो आणि विकेटकीपिंग करताना कमेंट करत राहतो. या सामन्यादरम्यानही असेच घडले. या सामन्यात त्याच्या आणि कुलदीप यादवमध्ये एक मजेदार घटना घडली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.  


व्हायरल व्हिडिओमध्ये ऋषभ पंत म्हणतो की, बी ऑल अप फॉर सिंग, त्यानंतर कुलदीप म्हणाला की, मी सिंगल घेणार नाही, त्यानंतर पंत म्हणाला की, घे आईची शपथ. तु सिंगल घेणार नाही. खंरतर, कुलदीपवर दबाव टाकण्यासाठी लाईव्ह मॅचदरम्यान पंत असे म्हणाला.






ऋषभ पंतचा आवाज स्टंपमध्ये कैद होणे हे काही नवीन नाही. जेव्हा पंत विकेटच्या मागे असतो तेव्हा तो खेळाडूंना काहीतरी म्हणत राहतो. असेच एक दृश्य आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आरसीबी सामन्या पण पाहिला मिळाला, जेव्हा विराट कोहली फलंदाजी करत होता आणि त्यानंतर पंत विकेटच्या मागे काहीतरी म्हणाला. तो पण व्हिडिओ व्हायरल झाला होता.  


हे ही वाचा -


Team India : दुलिप ट्रॉफीत विकेटचा पाऊस पाडला, युवा गोलंदाजाची भारतीय संघात निवड, आता बांगलादेश विरुद्ध मैदान गाजवाणार


IND vs BAN Test Series : पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, कोहली, बुमराह आणि पंतचे पुनरागमन, 'या' नव्या चेहऱ्यांना संधी


Bajrang Punia : 'काँग्रेस सोड नाही तर...', कुस्तीपटू बजरंग पुनियाला जीवे मारण्याची धमकी, परदेशातून आला मेसेज