Indian team for the first test against Bangladesh : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बांगलादेशविरुद्ध 19 सप्टेंबरपासून खेळवल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयने  भारतीय संघ जाहीर केला आहे. वेगवान गोलंदाज यश दयालचा प्रथमच भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. शिवाय जसप्रीत बुमराह, विराट कोहली आणि ऋषभ पंतने संघात पुनरागमन केले आहे. जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आलेली नाही, त्याची पहिल्या कसोटीसाठी निवड झाली आहे.


दुसऱ्या कसोटीसाठी संघाची निवड अद्याप झालेली नाही


निवड समितीने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारताच्या 16 खेळाडूंची निवड केली आहे. भारतीय संघाला 27  सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध दुसरी कसोटी कानपूरमध्ये खेळवली जाणार आहे. मात्र, दुसऱ्या कसोटीसाठी संघाची निवड अद्याप झालेली नाही. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेशिवाय भारत आणि बांगलादेशमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिकाही खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी अद्याप संघाची निवड झालेली नाही.


पहिल्या कसोटीसाठी BCCI ने 16 खेळाडूंची घोषणा


चेन्नई येथे खेळवल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी BCCI ने 16 खेळाडूंची घोषणा केली आहे. यष्टिरक्षक ऋषभ पंत, केएल राहुल आणि सरफराज खान यांनाही या संघात संधी मिळाली आहे. तर श्रेयस अय्यरला संघात स्थान मिळालेले नाही. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी निवड करण्यात आलेल्या 16 खेळाडूंमध्ये  चार फिरकीपटू आणि चार वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. दोन यष्टिरक्षकांसह एकूण आठ फलंदाज आहेत. डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल पहिल्यांदाच भारतीय संघात सामील झाला आहे. तो आयपीएल 2024 मध्ये आरसीबीकडून खेळला होता.


बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया-


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल , शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल




इतर महत्वाच्या बातम्या 


IPL 2025 च्या हंगामात मोठ्या घडामोडी, पाच संघांचे कॅप्टन बदलणार, शुभमन गिल ते डुप्लेसिस यादीत आणखी कोण असणार?