Team India Squad for Bangladesh Test Series : भारतीय स्टार क्रिकेटर्स सध्या दुलीप ट्रॉफीमध्ये व्यस्त आहेत. त्यांच्यासाठी देशातील प्रमुख देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांपैकी एक असलेल्या दुलीप ट्रॉफीचा सध्याचा हंगाम अतिशय महत्त्वाचा आहे. कारण भारतीय क्रिकेट संघ येत्या काही दिवसांत बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.


बांगलादेशविरुद्धच्या आगामी कसोटी आणि टी-20 मालिकेसाठी संघाची निवड 2024 दुलीप ट्रॉफीमधील कामगिरीवर अवलंबून असेल, असे बोलले जात आहे. मात्र यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. बांगलादेश मालिकेसाठी टीम इंडियाने जम्मू-काश्मीरमधील एका खेळाडूला बोलावले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज युधवीर सिंगला भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी नेट गोलंदाज म्हणून बोलावले आहे. मालिकेदरम्यान तो नेटमध्ये भारतीय फलंदाजांना गोलंदाजी करेल. 26 वर्षीय युधवीर हा उत्कृष्ट वेगवान गोलंदाज आहे.


हा 6 फूट 1 इंच गोलंदाज आयपीएल खेळला आहे. युधवीर हा लखनौ सुपर जायंट्सचा (LSG) भाग आहे. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज युधवीरने 2023 मध्ये एलएसजीसाठी आयपीएल पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 5 आयपीएल सामने खेळले आहे. हे लक्षात घेऊन तो नेट बॉलर म्हणून टीम इंडियाशी जोडला गेला आहे.


भारत-बांगलादेश मालिकेचे वेळापत्रक


भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात कसोटी आणि टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. बांगलादेशचा भारत दौरा 19 सप्टेंबरपासून सुरू होणार असून, पहिली कसोटी चेन्नईत खेळवली जाणार आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबर रोजी कानपूरमध्ये खेळवला जाईल. त्यानंतर 6 ऑक्टोबरला ग्वाल्हेरमध्ये 3 सामन्यांची टी-20 मालिका सुरू होईल. दुसरा टी-20 सामना 9 ऑक्टोबरला दिल्लीत, तर तिसरा आणि शेवटचा सामना 12 ऑक्टोबरला हैदराबादमध्ये खेळवला जाईल.


हे ही वाचा -


Bajrang Punia : 'काँग्रेस सोड नाही तर...', कुस्तीपटू बजरंग पुनियाला जीवे मारण्याची धमकी, परदेशातून आला मेसेज


Paris Paralympic 2024 : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने रचला इतिहास, 'इतकी' पदकं जिंकली अन् संपवली मोहीम