Ricky Ponting Home : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंग याने कोट्यवधी रुपयांचं आलिशान घर विकत घेतले आहे.  मेलबर्नमधील पॉश एरियामध्ये रिकी पॉटिंगने याने 20.6 मिलियन डॉलर किंमत मोजत घर घेतले आहे. भारतीय रुपयांमध्ये ही किंमत जवळपास 114 कोटी रुपये इतकी होती. 
 
ऑस्ट्रेलियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये रिकी पॉटिंगचं नाव येते. पॉटिंगने मेलबर्नमधील तूराक येथे सहा बेडरुमचं आलिशान घर विकत घेतलेय. यासाठी पॉटिंग याने जवळपास $20.6 मिलियन डॉलर (भारतीय किंमत - 114 कोटी रुपये) मोजले आहेत. ऑस्ट्रेलियातील मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे लॅविश घर ठरलेल्या किमतीपेक्षा जास्त किमतीमध्ये विकण्यात आले आहे. 


सर्व सोयी सुविधायुक्त घर -


'द एज'च्या रिपोर्ट्सनुसार, पॉटिंगचे हे अलिशान घर मेलबर्नमधील सर्वात चांगल्या एरियात आहे. या घराचे क्षेत्रफळ 1400 स्क्वॉअर मीटर इतके आहे. सहा बेडरुमचं हे घर पाहून अनेकजण प्रेमात पडतील. या अलिशान घरामध्ये एक ओपन प्लान असणारे इनडोअर-आउटडोअर लिव्हिंग स्पेस देण्यात आलेलं आहे. अधुनिक सोयी सुविधांसह या घरात किचन आहे. संगमरवरी दगडांचा वापर किचनमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे किचन अधिक आकर्षक दिसत आहे. या घरामध्ये टेनिस कोर्टही आहे. सहा बेडरुम असणाऱ्या लॅविश घरामध्ये जगभरातील सर्व सोयी सुविधा आहेत. 


सोशल मीडियावर चर्चा -


आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असताना रिकी पॉटिंग याने अनेकदा ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिलाय. पॉटिंगच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने दोन वेळा विश्वचषक विजयाला गवसणी घातली आहे. निवृत्तीच्या दहा वर्षानंतरही पॉटिंगचा जलवा अद्याप कायम आहे. पॉटिंग याने 114 कोटी रुपये मोजत मेलबर्नमधील पॉश एरियात घर विकत घेतले आहे. पॉटिंगने अलिशान घर घेतल्यानंतर सोशल मीडियावर याची चर्चा सुरु झाली आहे. काही चाहत्यांनी पॉटिंग क्रिकेटपासून दूर असतानाही इतके अलिशान आणि महागडे घर कसे विकत घेतलं? असा सवाल उपस्थित केला आहे. पॉटिंगच्या नवे घर सोशल मीडियावर चर्चेत आहे. 


निवृत्तीनंतर पॉटिंग कुठून कमाई करतो ?


ऑस्‍ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. तो आयपीएलमध्ये दिल्ली संघाचा मुख्य कोच आहे.  पॉटिंगला दिल्ली फ्रेचांइजीकडून यासाठी प्रत्येक आयपीएल हंगामासाठी कोट्यवधी रुपये दिली जातात. त्याशिवाय समालोचनातूनही पॉटिंग कमाई करतो. तसेच काही जाहिरातीमध्येही पॉटिंग दिसतो, यातून पॉटिंग बक्कळ कमाई करतो. वाढत्या वयाचा पॉटिंगच्या कमाईवर कोणताही परिणाम झाल्याचे दिसतेय.