एक्स्प्लोर

IPL Playoff Rules : हरली तरी जिंकली RCB! आता फायनलमध्ये पोहोचणं झालं आणखी सोपं; प्लेऑफचं गणित पाहून चाहतेही थक्क

RCB vs GT Qualifier 1 IPL 2026 : आयपीएल 2026 च्या 67व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 55 धावांनी विजय मिळवला.

RCB vs GT Qualifier 1 IPL 2026 : आयपीएल 2026 च्या 67व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 55 धावांनी विजय मिळवला. मात्र, एवढ्या मोठ्या विजय असूनही हैदराबादला अपेक्षित फायदा झाला नाही. कारण आरसीबी पराभूत होऊनही टॉप-2 मध्ये आपले स्थान कायम राखण्यात यशस्वी ठरली. दोन्ही संघांनी याआधीच प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित केला होता, त्यामुळे ही लढत थेट टॉप-2 साठी होती. 

लीग टप्प्यातील सर्व 14 सामने आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या तिन्ही संघांचे पूर्ण झाले आहेत. आरसीबी आणि गुजरातचे प्रत्येकी 18 गुण होते. त्यात एसआरएचनेही विजयासह 18 गुणांपर्यंत मजल मारली, पण नेट रनरेटमुळे त्यांना टॉप-2 मध्ये प्रवेश मिळवता आला नाही.

आयपीएल 2026 प्लेऑफचे नियम

सनरायझर्स हैदराबादला टॉप-2 मध्ये पोहोचण्यासाठी बंगळुरूला 160 धावांच्या आत रोखणे आवश्यक होते. मात्र 256 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना RCB ने 200 धावा केल्या आणि त्यामुळे त्यांचा नेट रनरेट फारसा घसरला नाही. बंगळुरूचा नेट रनरेट +0.783 इतका राहिला, तर गुजरात टायटन्स +0.695 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे. सनरायझर्स हैदराबादचा नेट रनरेट +0.524 राहिला आणि त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

यामुळे आता क्वालिफायर-1 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने भिडणार आहेत. हा सामना 26 मे रोजी धर्मशाळा येथे खेळवला जाणार आहे. या दोन्ही संघांना अंतिम फेरी गाठण्यासाठी दोन संधी मिळणार आहेत. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादला 27 मे रोजी एलिमिनेटर सामना खेळावा लागणार आहे. मात्र त्यांचा प्रतिस्पर्धी संघ अद्याप निश्चित झालेला नाही, कारण गुणतालिकेतील चौथ्या स्थानासाठी अजून चुरस कायम आहे.

आयपीएल 2026 च्या प्लेऑफ फॉरमॅटनुसार, क्वालिफायर-1 जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. पराभूत संघाला क्वालिफायर-2 मधून पुन्हा एक संधी मिळेल. एलिमिनेटरमध्ये जिंकणारा संघ क्वालिफायर-2 मध्ये जाईल, तर पराभूत संघाचे स्पर्धेतील आव्हान संपेल. त्यानंतर क्वालिफायर-2 जिंकणारा संघ अंतिम फेरीतील दुसरा संघ ठरेल.

हे ही वाचा -

Kavya Maran Viral Video : काव्या मारनचा LIVE सामन्यात संताप! कृणाल पांड्याच्या बॉलिंग ॲक्शनवर थेट गंभीर आरोप, नेमकं काय घडलं?, Video

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
Ajinkya Rahane : यशस्वी जयस्वालचं करिअर संकटात होतं, 4 सामन्यांच्या बंदीच्या कारवाईतून कसं वाचवलं? अजिंक्य रहाणेनं गुपित सांगितलं
यशस्वी जयस्वालला त्यावेळी वाईट वाटलं असेल, 4 सामन्यांच्या बंदीतून कसं वाचवलं? अजिंक्य रहाणे म्हणाला... 
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
IND vs SL : श्रीलंकेने गेममध्ये आणला ट्विस्ट! 4 विकेट बाकी असतानाच डाव घोषित, भारतासमोर 207 धावांचं लक्ष्य, शुभमन गिलचा मोठा निर्णय
श्रीलंकेने गेममध्ये आणला ट्विस्ट! 4 विकेट बाकी असतानाच डाव घोषित, भारतासमोर 207 धावांचं लक्ष्य, शुभमन गिलचा मोठा निर्णय
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
Embed widget