Ravindra Jadeja Instagram Post : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने जूनमध्ये झालेल्या 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आता तो फक्त कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसतो. अलिकडेच, जडेजा ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळताना दिसला. पाच सामन्यांच्या मालिकेत, तीन सामन्यांमध्ये जडेजाला प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवण्यात आले. आता एका पोस्टनंतर पुढील कसोटी मालिकेपूर्वी जडेजा या फॉरमॅटला अलविदा करणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.






बॉर्डर-गावसकर ट्रॉफीची शेवटची कसोटी सिडनीमध्ये खेळली गेली, ज्यामध्ये भारतीय आणि ऑस्ट्रेलियन संघ पिंक जर्सीमध्ये खेळू शकतो. आता जडेजाने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये त्याच सिडनी टेस्ट जर्सीचा फोटो शेअर केला आहे. जर्सीवर जडेजाचे नाव आणि त्याचा '8' क्रमांक दिसतो.






जड्डूच्या या स्टोरीनंतर सोशल मीडियावरील चाहत्यांनी असा अंदाज बांधण्यास सुरुवात केली की, भारतीय अष्टपैलू खेळाडू आता टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर कसोटी क्रिकेटला निरोप देण्याचा विचार करत आहे.






बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये जडेजाने फलंदाजी करताना 27 च्या सरासरीने 135 धावा केल्या होत्या, गोलंदाजी करताना 4 विकेट घेतल्या होत्या. गाबा येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर जड्डूचा साथीदार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण, जडेजाने फक्त जर्सीचा फोटो शेअर केला आहे, त्याने निवृत्तीबद्दल काहीही सांगितलेले नाही.






जडेजाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द


रवींद्र जडेजाने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 80 कसोटी आणि 197 एकदिवसीय सामने खेळले आहेत. याशिवाय त्याने 74 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. कसोटी सामन्यांमध्ये जड्डूने 3370 धावा केल्या आहेत आणि 323 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय, जडेजाने एकदिवसीय सामन्यांमध्ये 2756 धावा आणि 220 विकेट्स घेतल्या आहेत. उर्वरित टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 515 धावा केल्या आणि 54 विकेट्स घेतल्या.






हे ही वाचा -


Tamim Iqbal Announces Retirement : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी स्टार खेळाडूचा तडकाफडकी राजीनामा! सोशल मीडियावर पोस्ट करत निवृत्ती घोषणा


India Squad For ICC Champions Trophy : तारीख पे तारीख...! चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 'या' दिवशी होणार टीम इंडियाची घोषणा, BCCIने आयसीसीकडे केली विनंती