Sunil Gavaskar, Leicester cricket ground: भारताचा स्टार माजी फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांना लवकरच इंग्लंडमध्ये मोठा सन्मान प्राप्त होणार आहे. इंग्लंडच्या लीसेस्टर क्रिकेट मैदानाला (Leicester cricket ground) सुनील गावस्कर यांचं नाव देण्यात येणार आहे. यूरोप देशातील क्रिकेट स्टेडियमला भारतीय क्रिकेटपटूंचं नाव देण्याची ही पहिलीच वेळ असेल. येत्या शनिवारी (23 जुलै) या स्टेडियमचं नामकरण केलं जाणार आहे. या कार्यक्रमाला स्वत: सुनील गावस्कर उपस्थित राहणार आहेत.
लीसेस्टर क्रिकेट मैदानाला सुनील गावस्कर यांचं नाव देण्याचं सर्व श्रेय इंग्लंडमध्ये दीर्घकाळ भारतीय वंशाचे खासदार असलेल्या कीथ वाझ यांना जातंय. कीथ यांनी तब्बल 32 वर्षांपर्यंत लीसेस्टचं प्रतिनिधित्व केलंय. कीथ म्हणाले की, "गावसकर यांनी आम्हाला खेळपट्टी आणि मैदानाला त्यांचं नाव देण्याची परवानगी दिली, याचा आम्हाला अत्यंत सन्मान आणि आनंद वाटतो. गावस्कर एक दिग्गज क्रिकेटपटू आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घालून जगभरात नाव केलंय. सुनील गावस्कर फक्त 'लिटल मास्टर'च नाहीत तर, क्रिकेटमधील 'ग्रेट मास्टर' देखील आहेत."
कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारे पहिले क्रिकेटपटू
कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा गाठणारे सुनील गावस्कर पहिले क्रिकेटपटू होते. तसेच ते दिर्घकाळ सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या फलंदाजंही राहिले आहेत. परंतु, काही काळानंतर भारताचा मास्टर बास्टर सचिन तेंडुलकर यांनी सुनील गावस्कर यांचा विक्रम मोडला होता.
सुनील गावस्कर यांची क्रिकेट कारकिर्द
सुनील गावस्कर यांनी त्यांच्या कसोटी कारकिर्दीत भारताकडून 125 क्रिकेट सामने खेळले आहेत. ज्यात 51.12 सरासरीनं 10 हजार 122 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर 34 शतक झळकावली आहेत. तर, एकदिवसीय क्रिकेटमधील 108 सामन्यात त्यांनी 3 हजार 92 धावा केल्या आहेत.
हे देखील वाचा-
- IND vs WI, 1st ODI Live Streaming : आज भारत विरुद्ध वेस्ट इंडीज मालिकेतील पहिली मॅच, कधी, कुठे पाहाल सामना?
- Commonwealth Games 2022: कामनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा टीम इंडियाचा निर्धार- स्मृती मानधना
- World Athletics Championships 2022: ट्रिपल जंपमध्ये अंतिम फेरी गाठून एल्डहोस पॉलनं रचला इतिहास!