IND vs ENG | शुक्रवारपासून सुरु होणारी इंग्लंड विरोधातील टी20 सीरिज सुरु होण्यापूर्वी टीम इंडियासाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू रवींद्र जाडेजा दोन महिन्यांनी मैदानावर परतला आहे. रवींद्र जाडेजा अंगठ्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर होता. अशातच आपल्या दुखापतीतून सावरल्यानंतर जाडेजाने पुन्हा एकदा संघासोबत प्रॅक्टिस सुरु केली आहे. तब्बल दोन महिन्यांनंतर रवींद्र जाडेजा गोलंदाजी आणि फलंदाजी करताना दिसला. 


रवींद्र जाडेजाने स्वतः पुन्हा संघासोबत प्रॅक्टिस सुरु केली असल्याची माहिती दिली. जाडेजाने मैदानावर वापसीचा व्हिडीओही शेअर केला आहे. जाडेजाने लिहिलं की, "दोन महिन्यांनी मैदावार उतरल्यानंतर चांगंल वाटत आहे." 



रवींद्र जाडेजाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असतानाच सिडनी टेस्टच्या पहिल्या डावातच फलंदाजी करताना दुखापत झाली होती. स्कॅन केल्यानंतर रवींद्र जाडेजाच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली होती. फ्रॅक्चर झाल्यामुळे डॉक्टरांनी जाडेजाला 8 आठवड्यांपर्यंत मैदानापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. 


CSK साठी दिलासा 


अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे रवींद्र जाडेजा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या शेवटची कसोटी आणि इंग्लंडच्या विरोधातील चार कसोटी सामने खेळू शकला नाही. रवींद्र जाडेजाला इंग्लंड विरोधातील टी20 सीरिजसाठी संघात सहभागी करण्यात आलेलं नाही. जाडेजा वनडे सीरिजमध्ये सहभागी होणार की, नाही, यावर अद्याप कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 


रवींद्र जाडेजा दुखापतीतून सावरुन परतल्यामुळे चेन्नई सुपर किंग्सलाही मोठा दिलासा मिळाला आहे. 9 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या 14व्या सीझनमध्ये जाडेजा चेन्नई सुपर किंग्सच्या वतीने अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावताना दिसणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :