Ravichandran Ashwin: रविचंद्रन अश्विनने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत जबरदस्त अष्टपैलू खेळ करताना भारताच्या विजयात निर्णायक भूमिका निभावली. अश्विनने 88 धावांत 6 विकेट्स घेत बांगलादेशचे कंबरडे मोडले. या जोरावर भारताने पहिल्या कसोटीत 280 धावांनी बाजी मारताना दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
भारत आणि बांगलादेश (Ind vs Ban) यांच्यातील सामना पाहण्यासाठी रविचंद्रन अश्विनचे (Ravichandran Ashwin) कुटुंबीयही आले होते. अश्विनची पत्नी प्रीती नारायणन मुलांसोबत स्टेडियममध्ये होती. सामना जिंकल्यानंतर प्रीतीने अश्विनची मुलाखत घेतली. यादरम्यानचा व्हिडीओ देखील बीसीसीआयने शेअर केला आहे. या मुलाखतीमध्ये अश्विनने मुले आणि पत्नीशी संबंधित एक मजेशीर गोष्ट समोर आली आहे.
व्हिडीओमध्ये नेमकं काय?
अश्विनच्या पत्नीने त्याला सामन्याबाबत प्रश्न विचारला, घरच्या मैदानावर चांगली कामगिरी केल्यानंतर तुला कसे वाटते? अश्विन म्हणाला की मला समजत नाही की काय प्रतिक्रिया द्यावी. पण गोष्ट अशी आहे की चेन्नईत खेळणे नेहमीच खास असते. अश्विनने या संभाषणादरम्यान सांगितले की, “तिची (प्रीती) नेहमी तक्रार असते की सामन्यादरम्यान मी तिच्याकडे पाहत नाही. मुलंही तक्रार करतात की तुम्ही मॅचदरम्यान 'हाय' म्हणत नाही. सामन्यादरम्यान माझ्या कुटुंबाकडे पाहणे माझ्यासाठी कठीण होते. पण मी माझ्या परीने प्रयत्न करतो, असं अश्विनने सांगितले.
लाल मातीची खेळपट्टी नेहमीच वेगळे स्वरूप दाखविते-
चेंडू उसळी घेत असल्यामुळे वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टीवर गोलंदाजी करणे आनंददायी होते. त्यामुळेच येथील परिस्थिती फलंदाजांसाठी आव्हानात्मक होती, असेही अश्विन म्हणाला. तो म्हणाला की, खेळपट्टीवर तुम्ही प्रभावी गोलंदाजी केली तरीही धावा निघू शकतात. लाल मातीची खेळपट्टी नेहमीच वेगळे स्वरूप दाखविते.
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.
संबंधित बातमी:
वडिलांना पोराचं कौतुक, रोहित-विराटची मिठी; बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर सगळेच भावूक, Photo