Ravichandran Ashwin positive for Covid-19: इंग्लंडशी रिशेड्यूल कसोटी सामना खेळण्यासाठी (IND vs ENG) भारतीय संघातील बहुतेक खेळाडू इंग्लंडमध्ये झाले आहेत. मात्र, या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का लागलाय. भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला कोरोनाचा संर्सग झाला आहे. याबाबत बीसीसीआयच्या एका सूत्रानं पीटीआयला माहिती दिली. आश्विन हा सध्या क्वारंटाईन आहे आणि अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच तो इंग्लंडला जाऊ शकेल, अशीही माहिती समोर येत आहे. 


ट्वीट-



1 जूनपासून रिशेड्युल कसोटी सामन्याला सुरुवात
बीसीसीआयच्या सुत्राच्या हवाल्यानं पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं अश्विन भारतीय संघासोबत यूकेला रवाना झाला नाही.रिशेड्यूल कसोटी सामन्याला 1 जुलैपासून सुरुवात होणार आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी आश्विन बरा होईल, अशी अपेक्षा केली जात आहे. महत्वाचं म्हणजे, कोरोनाच्या जाळ्यात अडकलेल्या आश्विन लीसेस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. 


कसोटी मालिकेत भारत 2-1 नं आघाडीवर 
भारतीय संघ गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी कोरोना महामारीमुळं या मालिकेतील अखेरचा सामना पुढे ढकलण्यात आला. हाच सामना खेळण्यासाठी भारतीच संघ इंग्लंडशी भिडणार आहे. या मालिकेतील भारतीय संघ 2-1 नं आघाडीवर आहे. 


भारतीय कसोटी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर , मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिध कृष्णा.


हे देखील वाचा-