Sri Lanka Women vs India Women T20 ODI Series : श्रीलंका आणि भारत (SL vs IND) यांच्या 23 जूनपासून तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने आणि तीन टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाणार आहेत. दरम्यान भारतीय महिला संघ याआधीच जाहीर झाला असून आता नुकतीच श्रीलंका संघाने देखील 19 सदस्यीय महिला टीमची घोषणा केली आहे. यावेळी एकदिवसीय आणि टी20 दोन्ही संघाची कर्णधार म्हणून चामरी अटापट्टू असणार आहे. तर हसिनी परेरा, निलाक्षी डिसिल्वा, ओशादी राणासिंघे आणि इनोका राणावीरा सारखे दिग्गज खेळाडू यावेळी संघात असणार आहेत. विशेष म्हणजे श्रीलंकेसाठी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण करणारी विष्मी गुणारत्ने ही देखील दोन्ही संघामध्ये आहे.



भारतीय महिला संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार असून 23 जूनपासून सामन्यांना सुरुवात होणार आहे. यावेळी 23, 25 आणि 27 जून रोजी तीन टी20 सामने खेळवले जाणार आहेत. तर 27 जून, 1 आणि 7 जुलै रोजी तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. या सामन्यांसाठी श्रीलंकेचा 19 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला असून नेमकी कोणा-कोणाला संधी मिळाली आहे पाहूया... 


श्रीलंका महिला क्रिकेट टीम : चामरी अटापट्टू (कर्णधार), हसिनी परेरा, कविशा दिलहारी, निलाक्षी डिसिल्वा, अनुष्का संजीवनी, ओशादी राणसिंघे, सुगंदिका कुमारी, इनोका राणावीरम, अचिनी कुलसुरिया, हर्षिता समरविक्रम, विष्मी गुणारत्ने, मालसा शेहानी, अमा कंचना, उदेशिका प्रबोधिनी, रश्मिी डि सिल्वा, हंसिमा करूणारत्ने, कौशानी नुथ्यांगना, सत्या संदीपनी आणि तारीका सेवांदी. 


कशी आहे भारतीय टीम?


एकदिवसीय संघ 


हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उप कर्णधार), शेफाली वर्मा, यस्तिका भाटीया (यष्टीरक्षक), एस. मेघना, दिप्ती शर्मा, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, सिमरन बहादुर, रिचा घोष (यष्टीरक्षक), पुजा वस्त्रकर, मेघना सिंह, रेणुका सिंह, तानिया भाटीया (यष्टीरक्षक), हरलीन देवोल.


टी 20 संघ


हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उप कर्णधार), शेफाली वर्मा, यस्तिका भाटीया (यष्टीरक्षक), एस. मेघना, दिप्ती शर्मा, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, सिमरन बहादुर, रिचा घोष (यष्टीरक्षक), पुजा वस्त्रकर, मेघना सिंह, रेणुका सिंह, जेमिमा रॉड्रीग्स, राधा यादव


हे देखील वाचा-