Ravichandran Ashwin Retirement News : रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेदरम्यान अश्विनने (R Ashwin) अचानक निवृत्ती घेऊन सर्वांनाच चकित केले आहे. ब्रिस्बेन कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर भारताच्या दिग्गज फिरकीपटूने पत्रकार परिषदेद्वारे मोठी घोषणा केली. त्याच्या सोबत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माही होता.
आर अश्विनच्या निवृत्तीवर रोहित शर्मा आणि विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया
रविचंद्रनच्या निवृत्तीबद्दल बोलताना रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला की, भारतीय क्रिकेटमध्ये अश्विनसारखे मॅचविनर्स फार कमी आहेत. जेव्हा मी पर्थला आलो तेव्हा अश्विनच्या निवृत्तीबद्दल ऐकले, तेव्हा मी त्याला ॲडलेडमध्ये पिंक बॉल कसोटीपर्यंत थांबण्याचा सल्ला दिला.
तर विराट कोहली (Virat Kohli) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून म्हणाला की, मी 14 वर्षे तुझ्याबरोबर खेळलो आहे आणि आज तू निवृत्त होत आहेस असे मला सांगितलेस, तेव्हा मी थोडा भावूक झालो आणि इतक्या वर्षांच्या एकत्र खेळण्याचा फ्लॅशबॅक माझ्यासमोर आला. मी तुझ्यासोबतच्या प्रत्येक प्रवासाचा आनंद घेतला आहे, भारतीय क्रिकेटचा एक महान दिग्गज म्हणून तू नेहमीच आणि नेहमी लक्षात राहील. पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा आणि जवळच्या लोकांना खूप प्रेम. प्रत्येक गोष्टीबद्दल धन्यवाद मित्रा.
रविचंद्रन अश्विन यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास नकार दिला. तो फक्त म्हणाला की, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. भारतीय क्रिकेटपटू म्हणून आज माझा शेवटचा दिवस असेल.
कसोटीतील भारताचा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज
माजी महान लेगस्पिनर अनिल कुंबळेनंतर रविचंद्रन अश्विन हा भारताचा कसोटीतील दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. या स्टार ऑफस्पिनरने या फॉरमॅटमध्ये 106 सामन्यांमध्ये 537 विकेट घेतल्या आहेत. अश्विनच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 156 आणि टी-20 मध्ये 72 विकेट्स आहेत. गोलंदाजीसोबतच अश्विनने भारतासाठी फलंदाजीतही अनेक महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 3503 धावा आहेत ज्यात 6 शतके आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे.
R Ashwin retires from International Cricket VIDEO : आर अश्विनची निवृत्तीची घोषणा