India vs Australia 3rd Test Day 5 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटीत पहिले 4 दिवस बॅकफूटवर असलेल्या टीम इंडियाने पाचव्या दिवशी अप्रतिम पलटवार केला. चौथ्या दिवसापर्यंत भारतीय चाहते पावसामुळे सामना अनिर्णित राहील अशी प्रार्थना करत होते. पण पाचव्या दिवशी अचानक परिस्थिती बदलली. पाचव्या दिवशी सामना सुरू झाला तेव्हा हा सामना आता अनिर्णित राहील, असे सगळे म्हणत होते. निकाल लागण्याची शक्यता नव्हती. पण भारताने ऑस्ट्रेलियाला झटपट धावा करू दिल्या नाहीत. ऑस्ट्रेलियाने 7 बाद 89 धावा करून डाव घोषित केला. अशाप्रकारे भारताला विजयासाठी 54 षटकात 275 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसोटी ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर खेळली जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा भारताची धावसंख्या 9 विकेटवर 252 धावा होती. पाचव्या दिवशी भारताचा डाव 260 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. त्यांना पहिल्या डावात 185 धावांची आघाडी मिळाली. त्या त्यांनी आघाडीसह दुसऱ्या डावाला सुरुवात केली. जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाला सुरुवातीचा धक्का दिला. उस्मान ख्वाजा 8 धावा करून बाद झाला तर मार्नस लॅबुशेन केवळ 1 धावा करून बाद झाला. बुमराहनंतर आकाशदीपनेही नॅथन मॅकस्विनी आणि मिचेल मार्शच्या विकेट घेतल्या. मोहम्मद सिराजनेही वाहत्या गंगेत आपले हात धुऊन घेतले, आणि आधी स्टीव्ह स्मिथ आणि नंतर ट्रॅव्हिस हेडला 17 धावांवर आऊट केले.
गाबामध्ये टीम इंडिया पुन्हा इतिहास रचणार
भारत आणि ऑस्ट्रेलिया गाबा मैदानावर शेवटचे आमनेसामने आले होते, तेव्हा टीम इंडियाने 3 गडी राखून रोमहर्षक विजय नोंदवून इतिहास रचला होता. ऋषभ पंतची ती 89 धावांची खेळी आजही भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या हृदयात ताजी असेल. त्यावेळी 28 वर्षांनंतर गाबा मैदानावर ऑस्ट्रेलियाचा कोणत्याही संघाकडून पराभव झाला होता. आता भारतीय संघासमोर 275धावांचे लक्ष्य आहे. हे लक्ष्य गाठता येईल, पण चौथ्या डावात येथे फलंदाजी करणे सोपे नसेल.
हे वाचा -