Rajat Patidar : न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी रजत पाटीदारला मिळाली संधी, कशी आहे आतापर्यंतची कामगिरी?
India vs New Zealand : न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेपूर्वी श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्यावर रजत पाटीदार याला संघात संधी देण्यात आली आहे.
Rajat Patidar in Team India : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात 18 जानेवारीपासून म्हणजेच उद्यापासून एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. पण त्यापूर्वीच फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी बीसीसीआयने (BCCI) रजत पाटीदार (Rajat Patidar) याला संघात संधी मिळाली आहे. याआधी रजत पाटीदारने देशांतर्गत सामन्यांमध्ये तसंच आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी केली असून तो भारत 'अ' संघाकडूनही खेळला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे अय्यर बाहेर गेल्यावर पाटीदार हा चांगला पर्याय टीम इंडियासाठी उपलब्ध झाला आहे.
रजत पाटीदार देशांतर्गत सामन्यांमध्ये मध्य प्रदेशकडून खेळतो. त्याने ऑक्टोबर 2015 मध्ये प्रथम श्रेणी पदार्पण सामना खेळला. यानंतर त्याने डिसेंबर 2015 मध्ये लिस्ट ए मध्ये पदार्पण केले. इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. रजतच्या एकूण कामगिरीवर नजर टाकली तर त्याने 51 लिस्ट ए सामन्यांमध्ये 1648 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 3 शतकं आणि 8 अर्धशतकं झळकावली आहेत. रजतची सर्वोत्तम कामगिरी 158 धावांची आहे. त्याने प्रथम श्रेणी सामन्यांच्या 84 डावांमध्ये 3668 धावा केल्या आहेत. रजतने या फॉरमॅटमध्ये 11 शतकं आणि 20 अर्धशतकं केली आहेत. विशेष म्हणजे रजतचा अलीकडचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे. विदर्भाविरुद्ध खेळताना त्याने शतक झळकावलं. एमपीसाठी रजतने 121 धावांची इनिंग खेळली. याआधी त्याने रेल्वे आणि चंदीगडविरुद्ध अर्धशतकं झळकावली होती. त्याने चंदीगडविरुद्ध 88 धावा केल्या होत्या. रजतने गेल्या 7 सामन्यात सलग अर्धशतकं झळकावली आहेत. यादरम्यान त्याने शतकही झळकावलं. तो मध्य प्रदेशच्या अंडर-19 आणि अंडर-22 संघांसाठीही खेळला आहे. रजत आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळतो. आयपीएल 2022 मध्येही त्याने महत्त्वाची खेळी केल्याचं दिसून आलं होतं. या सर्वाचीच पोचपावती म्हणून रजतला संघात संधी मिळाली आहे.
भारताचा एकदिवसीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, रजत पाटीदार, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार)वॉशिंगट सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराद, उमरान मलिक
हे देखील वाचा-