Afghanistan cricketer Rahmanullah Gurbaz : विश्वचषकातील आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावीत करणारा अफगाणिस्तान संघ पुन्हा एकदा चर्चेत आहे. अफगाणिस्तानचा सलामी फलंदाज गुरबाज याने प्रत्येक भारतीयांची मनं जिंकणारे काम केलेय. अहमदाबाद येथे गुरबाज याने मध्यरात्री फुटपाथवर झोपलेल्या लोकांना पैसे देऊन मदत केली आहे. या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. गुरबाजचे नेटकरी कौतुक करत आहेत. 


अफगाणिस्तानची यंदाच्या विश्वचषकतातील कामगिरी कौतुकास्पद झाली. त्यांनी नऊ सामन्यात चार विजय मिळवत सहावे स्थान काबिज केले. अफगाणिस्तान संघ 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही पात्र ठरलाय. विश्वचषकातील अखेरच्या साखळी सामन्यानंतर अफगाणिस्तान संघातील गुरबाज याने फुटपाथवर झोपच असणाऱ्या लोकांच्या उशाशी पाचशे पाचशेच्या नोटा ठेवत त्यांना दिवाळीची भेट दिली. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. 


या व्हिडिओत तो अहमदाबाद येथील बेघर लोकांप्रती प्रेम दाखवत त्यांची मदत करताना दिसला. 21 वर्षीय गुरबाज या व्हिडिओत फुटपाथवर झोपलेलेल्या लोकांना दिवाळी साजरी करता यावी म्हणून मध्यरात्री 3 वाजता त्यांना पैसे वाटताना दिसत आहे. गुरबाजच्या या कृतीने सर्वांची मने जिंकली आहेत.


पाहा व्हिडीओ -






अफगाणिस्तानची विश्वचषकातील कामगिरी कशी राहिली.. त्यांनी साखळीतील चार सामन्यात विजय मिळवला तर पाच सामन्यात पराभवाचा धक्का बसला. पाहा त्यांची विश्वचषकातील कामगिरी -



गतविजेत्याला धक्का


विश्वचषकात अफगाणिस्तान संघाला दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. बांगलादेश आणि भारताने अफगाणिस्तानचा पराभव केला.15 ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये अफगाणिस्तान संघाने इंग्लंडचा पराभव केला. अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना 284 धावांचा डोंगर उभरला. प्रत्युत्तरदाखल इंग्लंडचा संघ 215 धावांपर्यंत मजल मारली.


पाकिस्तानला झटका -


चेन्नईमध्ये अफगाणिस्तान संघाने 1992 च्या विश्वचषक विजेत्या पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिलाय.  अफगाण संघाने पाकिस्तानचा आठ विकेट्सने पराभव केला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 282 धावांपर्यंत मजल मारली होती. अफगाण संघाने हे आव्हान दोन विकेट्च्या मोबदल्यात सहज पार केले.


पुण्यात लंकादहन -


पुण्यात अफगाणिस्तान संघाने 1996 च्या विश्वचषकक विजेत्या श्रीलंकेला पराभवाचा झटका दिला.  अफगाणिस्तानने श्रीलंकेचा सात विकेट्सने पराभव केला. श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना फक्त 241 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरदाखल अफगाणिस्तान संघाने हे आव्हान तीन विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले.


नेदरलँड्सचा पराभव -


विश्वचषक विजेत्या संघांना पराभवाचा धक्का देणाऱ्या अफगाणिस्तान संघाने लखनौमध्येमध्ये नेदरलँड्सविरोधातही विजय मिळवला. नेदरलँड्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 181 धावांपर्यंत मजल मारली. अफगामिस्तान संघाने हे माफक आ्हान तीन विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले.


कोण कोणत्या संघाकडून पराभवाचा धक्का-


विश्वचषकाची सुरुवात खराब -


अफगाणिस्तान संघाची विश्वचषकाची सुरुवातच पराभवाने झाली. बांगलादेशने अफगाणिस्तानचा सहा विकेट्सने पराभव केला. धरमशालाच्या मैदानात प्रथम फलंदाजी करताा अफगाणिस्तान संघाला फक्त 156 धावा करता आल्या. प्रत्युत्तरदाखल बांगलादेशने हे आव्हान चार विकेट्सच्या मोबदल्यात पार केले.


भारताने धुतले -


दिल्लीमध्ये भारताने अफगाणिस्तानचा आठ विकेट्सने पराभव केला. अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना आठ विकेट्सच्या मोबदल्यात 172 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरदाखल भारताने हे आव्हान दोन विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. अफगाणिस्तानचा हा विश्वचषकातील सलग दुसरा पराभव झाला होता.


न्यूझीलंडचा विजय -


चेन्नईच्या मैदानात न्यूझीलंड संघाने अफगाणिस्तान संघाचा 149 धावांनी पराभव केला होता. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 288 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल अफागण संघ 139 धावांपर्यंत मजल मारु शकला. 



ऑस्ट्रेलियाने बाजी मारली - 


ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा तीन विकेट्सने पराभव केले. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 291 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर गोलंदाजांनी कांगारुंना लवकर माघारी झाडले. 91 धावांत ऑस्ट्रेलियाचे सात फलंदाज बाद झाले होते. पण अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याने द्विशतक ठोकून विजय खेचून आणला. ऑस्ट्रेलियाने तीन विकेट्सने विजयम मिळवला. 


दक्षिण आफ्रिकेचा विजय - 


अखेरच्या साखळी सामन्यात आफ्रिकेने अफगाणिस्तानचा पाच विकेट्सने पराभव केला. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 244 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरदाखल आफ्रिकेने हे आव्हान पाच विकेट्सच्या मोबदल्यात पार केले.