IND vs NED, World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये (ICC ODI World Cup 2023) आज भारत विरुद्ध नेदरलँड्स (India vs Netherlands) यांच्यात सामना रंगणार आहे. विश्वचषक 2023 (World Cup 2023) च्या शेवटच्या साखळी सामन्यात भारत आणि नेदरलँड संघ आज आमने-सामने येणार आहेत. एकदिवसीय विश्वचषकात आतापर्यंत टीम इंडियाची (Team India) विजयी वाटचाल पाहायला मिळाली आहे. सलग आठ सामन्यात भारताने विजय मिळवल आहे. आजच्या सामन्यात नवव्या विजयासह दिवाळी सणाचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडिअमवर आज दुपारी 2 वाजता हा सामना रंगणार आहे.


विश्वचषक 2023 मधील शेवटचा लीग सामना


आजचा सामना नेदरलँड्ससाठी महत्त्वाचा आहे. नेदरलँडचा संघ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतून बाहेर पडला असून त्यांच्यासाठी हा सामना 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरण्याचा शेवटचा मार्ग आहे. हा सामना जिंकल्यास नेदरलँड्स बांगलादेशला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मागे टाकू शकतो. तर, विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघाने आधीच अंतिम-4 मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आजचा टीम इंडियासाठी उपांत्य फेरीचा सराव सामना असेल. 


भारताविरुद्ध सामना जिकणं नेदरलँड्ससाठी गरजेचं


विश्वचषक 2023 मध्ये पाकिस्तान व्यतिरिक्त टॉप-7 संघांना चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये खेळण्याची संधी मिळेल. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चं यजमानपदाचा पाकिस्तानकडे असल्याने त्यांनी आधीच या स्पर्धेत प्रवेश केला आहे. सध्या पॉइंट टेबलमध्ये नेदरलँड्स शेवटच्या स्थानावर आहे. त्यामुळे संघाला आजचा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावाच लागेल. 


प्रसिद्ध कृष्णाला संधी मिळणार?


भारतीय संघ उपांत्य फेरीपूर्वी कोणताही धोरणात्मक प्रयोग करणार नसल्याचं, प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं होतं. पण, या सामन्याकडे उपांत्य फेरीचा सराव सामना म्हणून पाहिल्यास काही खेळाडूंना विश्रांती देण्याची शक्यता आहे.. टीम इंडिया आज जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांना विश्रांती देऊ शकते आणि प्लेइंग-11 मध्ये प्रसिद्ध कृष्णा आणि आर अश्विनला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


नेदरलँड्स संघात बदल करणार?


नेदरलँड्सने या संपूर्ण विश्वचषकात बहुतेक वेळा प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे आजच्या सामन्यातही नेदरलँड्सच्या प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल करण्याची शक्यता फार कमी आहे.


टीम इंडियाची प्लेइंग-11 कशी असेल?


टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव/आर अश्विन, जसप्रीत बुमराह/प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.


नेदरलँड्सचा संभाव्य प्लेइंग-11 


मॅक्स ओ'डॉड, वेस्ली बरासी, कॉलिन एकरमन, सिब्रांड एंजेलब्रेक्ट, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), बास डी लीडे, तेजा नदामानुरु, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.