अहमदाबाद : भारत आणि न्यूझीलंडच्या महिला संघात तीन एकदिवयीस सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना अहमदाबादमध्ये खेळवण्यात आला. भारताला या सामन्यात 76 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मात्र, या मॅचमध्ये भारताची खेळाडू राधा यादवनं घेतलेला कॅच अफलातून ठरला. राधा यादवनं नंतर फलंदाजी करत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण तिला यश आलं नाही. 


भारत आणि न्यूझीलंडच्या दोन्ही संघ प्रत्येकी  एक सामना जिंकले आहेत. मालिका विजयासाठी तिसरा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी आवश्यक आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुसरी लढत पार पडली. या लढतीत राधा यादवनं भारताची ती सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक असल्याचं दाखवून दिलं आहे. राधा यादवनं ब्रुक हॅलिडे हिनं मोठा फटका मारल्यानंतर उलट्या दिशेनं धावत जाऊन, त्यानंतर हवेत उडी मारत कॅच घेतला. राधा यादवनं कॅच घेतल्याचं कळताच प्रेक्षकांनी आणि टीम इंडियाच्या इतर खेळाडूंनी जोरदार जल्लोष केला.


प्रिया मिश्रा 32 व्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत होती. या ओव्हरचा तिसरा बॉल हॅलिडेनं हवेत मारला. यावेळी बॉल 30 यार्डच्या बाहेर सुरक्षित ठिकाणी पडेल,अशी अपेक्षा सर्वांची होती. मात्र, राधा यादवनं अफलातून कॅच घेत सर्वांचा अंदाज चुकला. 


हॅलिडेकडून देखील शॉट मारताना चूक झाली होती. तिला व्यवस्थितपणे शॉट मारता आला नव्हता. राधा यादवनं सुरुवातीला उलट्या दिशेनं धावत जाऊन त्यानंतर हवेत उडी मारत कॅच घेतला. यामुळं प्रिया मिश्राला तिच्या आंतरराष्ट्रीय करिअरमधील  पहिली विकेट मिळाली. 


बीसीसीआय वुमन या अधिकृत अकाऊंटवरुन याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. बीसीसीआयनं अनदर राधा यादव स्पेशल असं कॅप्शन दिलं आहे. 


राधा यादवचा अफलातून कॅच






न्यूझीलंडचा भारतावर विजय


न्यूझीलंडच्या संघानं भारताला या सामन्यात 76 धावांनी पराभूत केलं. न्यूझीलंडनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 259 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताचा संघ 183 धावांवर बाद झाला.


राधा- सायमाची दमदार फलंदाजी मात्र अपयश


भारतानं 259 धावांचा पाठलाग करताना 8 विकेट गमावून 108 धावा केल्या होत्या. त्यानंतर राधा आणि सायमा या दोघींनी 70 धावांची भागिदारी केली. भारताचा संघ 183 धावांवर बाद झाला. सायमानं 29 धावा तर राधा यादवनं 48 धावा केल्या. राधा यादवनं न्यूझीलंडच्या चार विकेट घेतल्या.


दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्या मालिकेतील तिसरी लढत निर्णयाक होणार आहे. तिसरी मॅच जिंकणारा संघ मालिका जिंकेल.


इतर बातम्या : 


IND vs NZ 3rd Test : दिवाळीच्या सुट्ट्या रद्द; सलग दोन पराभव लागले जिव्हारी, BCCI ॲक्शन मोडवर! स्टार प्लेअरबाबत मोठा निर्णय