IND vs NZ 3rd Test : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने प्रथमच मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका गमावली. टीम इंडियाच्या या पराभवामुळे खेळाडूंची चांगलीच खरडपट्टी काढली जात आहे. न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटीत भारताचा 113 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. गेल्या 12 वर्षात भारताने आपल्याच भूमीवर मालिका गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे.


कसोटी मालिकेतील पराभवानंतर दुखावलेल्या भारतीय संघ व्यवस्थापनाने आता दिवाळीत खेळाडूंना विश्रांती न देण्याचा निर्णय घेतला आहे. 2 प्रशिक्षण सत्रेही देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबत तिसऱ्या सामन्यापूर्वी खेळाडूंना सत्रात सहभागी होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 1 नोव्हेंबर रोजी मालिकेतील शेवटचा कसोटी सामना खेळला जाणार आहे. म्हणजेच भारतीय संघातील खेळाडूंना तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीपूर्वी दोन सराव सत्रांमध्ये सहभागी व्हावे लागेल. ज्यामध्ये विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्मा या खेळाडूंचाही समावेश असेल. म्हणजेच या बड्या खेळाडूंनाही सराव सत्रात सहभागी होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.






इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, एका सूत्राने सांगितले की, संघ व्यवस्थापनाने खेळाडूंना 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी दोन दिवसांच्या सरावासाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. हे अनिवार्य आहे. कसोटी मालिकेत न्यूझीलंड 2-0 ने पुढे आहे, त्यामुळे भारतीय संघ कोणत्याही किंमतीत तिसरा कसोटी सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल. खरे तर आता या मालिकेत क्लीन स्वीप होण्याची भीती संघ व्यवस्थापनालाही सतावत आहे.


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची परिस्थिती लक्षात घेता, भारतीय संघाला दुसरी चूक परवडणारी नाही. त्यामुळे भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि संघ व्यवस्थापनाच्या इतर सदस्यांना प्रत्येक खेळाडूने सर्व प्रशिक्षण सत्रात सहभागी व्हावे असे वाटते. पुणे कसोटी संपल्यानंतर मालिकेच्या अंतिम सामन्याच्या तयारीसाठी खेळाडूंना दोन दिवसांची विश्रांती देण्यात आली आहे, तर विराट कोहली आणि रोहित शर्मा सारखे खेळाडू आपल्या कुटुंबासह मुंबईत पोहोचले आहेत, 27 ऑक्टोबरला मुंबईला परतले. सपोर्ट स्टाफसोबत मुंबईत जमणार आहे.


हे ही वाचा -


IND vs NZ 3rd Test : विराटवर टांगती तलवार, जडेजा-बुमराहही OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत 'ही' असणार टीम इंडियाची प्लेइंग-11


CSK Retained Players List 2025 : थाला IPL खेळणार; चेन्नईने 'या' 5 खेळाडूंशी केली डील, जडेजाला 18 कोटी तर MS धोनीला...