IND vs ENG, R Ashwin Ruled Out : भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोट (Rajkot) येथे सुरु असलेला तिसरा कसोटी सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे. दुसऱ्या दिवशी अश्विनने (R Ashiwin) इंग्लंडची सलामी जोडी फोडत कसोटी करिअरमधील 500 विकेट घेण्याचा भीमपराक्रम केला. पण काही तासानंतर अश्विनने तिसऱ्या कसोटीतून माघार घेतली आहे. कौटुंबिक कारणामुळे तिसरा कसोटी (IND vs ENG) सामना अर्ध्यावर सोडत अश्विन चेन्नईला परतला आहे. राजकोट कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात 445 धावांचा डोंगर उभारला. इंग्लंडकडून भारताच्या या धावसंख्येला जोरदार प्रयुत्तर देण्यात आले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने दोन बाद 207 धावा केल्या आहेत. इंग्लंडचा संघ अद्याप 238 धावांनी पिछाडीवर आहे. मोक्याच्या क्षणी अश्विन नसल्यामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय. आता भारतीय संघाकडे फक्त चार गोलंदाजांचा पर्याय उपलब्ध राहिलाय. रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव या दोघांवर फिरकीची धुरा असेल. तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यावर वेगवान गोलंदाजीची धुरा असेल. त्याशिवाय यशस्वी जायस्वाल हा गोलंदाजीचा पर्याय रोहित शर्माकडे असेल. तिसऱ्या दिवशी रोहित शर्मा कोणती रणनिती करणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय. (R Ashwin withdraws from the 3rd Test due to family emergency)


आर. अश्विन राजकोट कसोटी अर्ध्यावर सोडून चेन्नईला आपल्या घरी परतलाय. बीसीसीआयनं मध्यरात्री अश्विनने तिसऱ्या कसोटीतून माघार घेतल्याचं सांगितलं. बीसीसीआयकडून अश्विनच्या या निर्णयाचं कारणही सांगण्यात आलेय. बीसीसीआयनं ट्वीट करत सांगितलं की, अश्विन कौटुंबिक एमेरजन्सीमुळे सामना अर्ध्यावर सोडून घरी परतला आहे. या कठीण परिस्थितीमध्ये खेळाडू आणि बीसीसीआय अश्विनसोबत आहेत. गरज पडल्यास  बीसीसीआयकडून अश्विनला शक्य ती मदत केली जाईल.






500 वी विकेट वडिलांना समर्पित - 


राजकोट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी अश्विनने इंग्लंडचा सलामी फलंदाज जॅक क्राउली याला तंबूत पाठवत कसोटी क्रिकेटमधील 500 विकेट पूर्ण केल्या. या खास विक्रमानंतर अश्विन भावनिक झाला होता. अश्विन याने 500 वी विकेट वडिलांना समर्पित केली. तो म्हणाला की, वडील प्रत्येक कठीण परिस्थितीमध्ये सोबत उभे राहिले होते. 


आणखी वाचा :


IND vs ENG 3rd Test : इंग्लंडचे भारतास जोरदार प्रत्युत्तर, डकेटच्या शतकाने टीम इंडियाचे टेन्शन वाढवलं