IND vs SA 2nd T20 : दक्षिण आफ्रीका (South Africa) आणि भारत (India) यांच्यातील 5 टी20 सामन्यांच्या मालिकेत भारताने पहिला सामना गमावला आहे. उत्तम फलंदाजी करुनही भारताचा पराभव झाल्याने दुसऱ्या सामन्यात मात्र विजय मिळवून मालिकेत पुनरागमन करण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. दुसरा सामना ओरीसा राज्यातील कटक शहराच्या बाराबती स्टेडिअममध्ये (Barabati Stadium) खेळवला जाणार आहे. दरम्यान या महत्त्वाच्या सामन्यासाठी दोन्ही संघ कटकमध्ये दाखल झाले असून खास पद्धतीने दोन्ही संघाच्या खेळाडूंच स्वागत करण्यात आलं आहे. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मालिके आफ्रिका पुढे
डेविड मिलर आणि रॅसी वॅन डर डुसेन यांच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं भारताचा सात गड्यांनी पराभव केला. भारताने दिलेले 212 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकाने सात गडी आणि पाच चेंडू राखून पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेकडून डेविड मिलर आणि डुसेन यांनी मॅच विनिंग खेळी केली. डेविड मिलरने नाबाद 64 तर डुसेन याने नाबाद 75 धावांची खेळी केली. ईशान किशनची 76 धावांची खेळी व्यर्थ केली. या विजयासह दक्षिण आफ्रिकेनं पाच सामन्याच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
असे आहे दोन्ही संघ -
भारत
ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक.
दक्षिण आफ्रिका
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अॅनरिक नोर्किया, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रासी वॅन डर डसन, मार्को जॅनसेन.
उर्वरीत सामन्यांचे वेळापत्रक-
सामना | दिनांक | ठिकाण |
दुसरा टी20 सामना | 12 जून | बाराबती स्टेडियम, कट्टक |
तिसरा टी20 सामना | 14 जून | डॉ वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम,विशाखापट्टणम |
चौथा टी20 सामना | 17 जून | सौराष्ट्र क्रिकेट असोसीएशन स्टेडियम, राजकोट |
पाचवा टी20 सामना | 19 जून | एम. चिन्नस्वामी स्टेडियम बंगळुरु |
हे देखील वाचा-
- IND vs SA: 'मिलर'ची 'किलर' कामगिरी! 'इतक्या' वेळा जिंकलाय सामनावीराचा पुरस्कार, एबी डिविलियर्सलाही टाकलं मागं
- 'चार महिन्यातचं त्याला भारताचा बेस्ट ऑलराऊंडर बनवेल' मोहसीन खानबाबत मोहम्मद शामीचं मोठं वक्तव्य
- IND vs SA: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध भारताकडून कुठं झाली चूक? जाणून घ्या पराभवाची कारणं