Prithvi Shaw Fight Viral Video : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पृथ्वी शॉ याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शॉ एका महिलेसोबत भररस्त्यात बाचाबची करताना स्पष्टपणे दिसून येत आहे. भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि तरुणी यांच्यात बाचाबाची झाली. संबधित तरुणीच्या एका मित्राने या दरम्यान व्हिडीओ तयार केला असून त्यानंतर  या  सर्व प्रकरणानंतर पृथ्वी शॉच्या मित्राच्या (आशिष यादव) गाडीवर हल्ला झाल्याची देखील चर्चा आहे. पृथ्वी शॉच्या मित्राच्या गाडीवर दोन जणांनी हल्ला केला होता.


पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉसोबत सेल्फी काढताना हाणामारी झाल्याचं यात सांगण्यात येत आहे. हे संपूर्ण प्रकरण जोगेश्वरी लिंक रोड येथील लोटसच्या पेट्रोल पंपाजवळ झालं आहे. काही वेळापूर्वी समोर आलेल्या माहितीत पृथ्वी शॉच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वी शॉ याचा एका हॉटेलात पार्टी सुरु असताना सेल्फी काढण्यावरुन वाद झाला. त्यानंतर हॉटेलमधून शॉ दुसऱ्या कारने घराकडे निघाला होता. त्यादरम्यान त्याच्या मित्राच्या कारमध्ये तो असल्याचं संबधितांना वाटलं आणि त्यांनी या कारवर हल्ला केला. पण आता आणखी काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यात एक तरुणी आणि शॉ यांच्यात भररस्त्यात बाचाबाची होत असल्याचं दिसत आहे. तसंच  संबधित तरुणीचा मित्र हा व्हिडीओ तयार करत असून शॉ याने त्यांना हाणामारी केल्याचे आणि विविध आरोप तो लावत आहे. तर नेमकं प्रकरण काय? हे लवकरच स्पष्ट होईल. त्यापूर्वी व्हायरल होणार व्हिडीओ तुम्ही पाहू शकता


पृथ्वी शॉ याचा व्हायरल व्हिडीओ






पोलिसांनी दाखल केला गुन्हा


मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपींनी पृथ्वी शॉच्या मित्राला धमकी दिली की, जर त्याला हे प्रकरण दडपायचे असेल तर त्याला 50 हजार रुपये द्यावे लागतील, जर त्याने तसे केले नाही तर तो त्याला खोट्या प्रकरणात अडकवू. त्याचवेळी या अपघातानंतर पृथ्वीच्या मित्रांनी तुटलेली काच गाडी घेऊन ओशिवरा पोलीस ठाणे देखील गाठले. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सना गिल आणि शोबित ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींविरुद्ध भादंवि कलम 384,143,148,149,427,504 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.


हे देखील वाचा-