Prithvi Shaw Dance Goes Viral : टीम इंडियाचा सलामीवीर पृथ्वी शॉ बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. अलीकडेच पृथ्वी शॉलाही फिटनेस आणि शिस्तीच्या कारणांमुळे मुंबईच्या रणजी संघातून वगळण्यात आले आहे. यानंतर त्याने व्यायाम करतानाचा स्वतःचा फोटो पोस्ट केला. पण, आता त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वणव्यासारखा व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो धिंगाणा करताना दिसत आहे. पृथ्वी शॉचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक त्याला प्रचंड ट्रोल करत आहेत.


खरंतर, पृथ्वी शॉचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. त्यात तो डान्स पार्टी करताना दिसत आहे. पृथ्वीसोबत त्याची कथित गर्लफ्रेंड निधी तापडिया आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री शेफाली जरीवाला देखील आहे. इतर काही मुलींही नाचत आहेत. खालील व्हिडिओमध्ये तो तांबेडी चमडी या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. शॉने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ शेअर केला आहे.






मुंबईच्या फलंदाजाचा हा व्हिडिओ त्याच्या वाढदिवसाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय संघाचा सलामीवीर पृथ्वीने 9 नोव्हेंबर रोजी आपला 25 वा वाढदिवस साजरा केल्याची माहिती आहे. सेलिब्रेशन करताना पृथ्वी शॉने त्याचा व्हिडिओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. 25 वर्षीय शॉने सहा वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापतीमुळे तो संघाबाहेर होता. त्यानंतर त्याला संधी मिळाली नाही.  


फिटनेस आणि शिस्तभंगाच्या मुद्द्यांमुळे पृथ्वी शॉला त्रिपुराविरुद्धच्या रणजी सामन्यासाठी मुंबई संघातून वगळण्यात आले होते. तो मुंबईच्या सराव सत्रांना नियमितपणे उपस्थित राहत नव्हता, त्यामुळे निवडकर्त्यांनी त्याला वगळले. लक्षात घेण्यासारखे आहे की अंडर-19 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर शॉचे नाव चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आले आहे. गेल्या वर्षी नाम एका मुलीसोबत भांडण आणि विनयभंगामुळे चर्चेत आला होता. आता त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे तो चर्चेत आहे.


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून पृथ्वी शॉने भारतासाठी पाच कसोटी, सहा एकदिवसीय आणि एक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तो अखेरचा जुलै 2021 मध्ये भारताकडून खेळताना दिसला होता.


हे ही वाचा -


IPL 2025 Auction : राजस्थान रॉयल्सला होणार पश्चाताप? लिलावापूर्वी पठ्ठ्याने खेळली तुफानी इनिंग; ठोकले 8 चौकार अन् 6 षटकार


Sanjay Manjrekar : ना नीट शब्द...ना नीट बोलण्याची पद्धत...; संजय मांजरेकरांनी गौतम गंभीरला सुनावले, BCCIला दिला सल्ला