Virat kohli With PM Modi : कॅप्टन रोहित जितका कूल होता, तितकाच  माजी कॅप्टन आणि रनमशीन विराट कोहली टेन्स होता. कारण, संपूर्ण विश्वचषकात त्याच्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या. एका पाठोपाठ एक सामन्यात विराट अपयशी होत होता. मात्र, फायनलमध्ये विराटची बॅट तळपली आणि टीम इंडियाला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. विराटसाठी हा विश्वचषक कसा होता, जो खुद्द विराटनं सांगितले तेही पंतप्रधान नरेंद्र मोदींना. होय... पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या संवादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये विराट कोहलीनं सांगितलेला त्याचा अनुभव सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. 


भारतानं टी20 विश्वचषक जिंकला आणि एकशे चाळीस कोटी भारतीयांनी त्याचा जल्लोष केला. याच जल्लोषात खुद्द पंतप्रधान मोदींही सामील होते. आणि तेही क्रिकेट चाहते आहेत. हेच आपल्याला या व्हीडिओमधून दिसून आलं. बार्बाडोसवरुन टीम इंडिया भारतात दाखल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. याच भेटीत नरेंद्र मोदींनी तमाम देशवासियांकडून विश्वविजेत्यांचे आभार मानले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टीम इंडियाच्या खेळाडूंची विश्वचषकातील कामगिरीवर चर्चा झाली. यावेळी मोदींनी रोहित शर्मा, राहुल द्रविड, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्यासह टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूंचा गौरव केला. त्याशिवाय त्यांच्यााशी चर्चाही केली. या संपूर्ण चर्चेचा व्हिडीओ समोर आलाय. रोहित शर्मा आणि विराट कोहलींनी पंतप्रधान मोदींशी मनमोकळा संवाद, आव्हानांचा सामना कसा केला याबाबत अनुभव शेअर केले.  


अहंकार वाढला की....


विश्वचषक तुमच्यासाठी चांगला झाला नाही, पण फायनलमध्ये तुम्ही काय विचार केला? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विराट कोहलीला विचारला होता. त्यावर बोलताना विराट कोहली म्हणाला की," अहंकार वाढला की खेळ आपल्यापासून दूर जातो. मी जे काही करण्याचा प्रयत्न करत होतो, ते होत नव्हते. मी ते करेन असे जेव्हा तुम्हाला वाटते तेव्हा कुठेतरी तुमचा अहंकार येतो.   त्यामुळे अंहकार सोडण्याची गरज होती. मी म्हटल्याप्रमाणे, सामन्याची परिस्थिती अशी होती की मला माझा अहंकार वर ठेवायला जागा नव्हती. संघहितासाठी मागे ठेवावा लागलाय. जेव्हा खेळाला आदर दिला गेला तेव्हा त्या दिवशी खेळानेही सन्मान दिला. हा अनुभव मला अंतिम सामन्यातून मिळाला."


पाहा व्हिडीओ 






कुठे फ्रेंडली सामना तर कुठे आक्रमक फटकेबाजी दिसली.. खरी रंगत आली.. ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विश्वविजेत्या संघात झालेल्या चर्चेचा व्हीडिओ समोर आला.. काल, सकाळी जेव्हा टीम इंडिया मायदेशी परतली.. तेव्हा पंतप्रधान मोदींनी त्यांच्याशी जवळपास दीड तास गप्पा मारल्या.. त्याच बैठकीचे फोटोज कालच आले होते.. मात्र, व्हीडिओ आणि त्यांच्यातली चर्चा समोर आली नव्हती.. आज तो व्हीडिओ प्रसिद्ध करण्यात आला.. आणि लक्षात आलं की, एकशे चाळीस कोटी क्रिकेटवेड्यांच्या आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा क्रिकेटचे चाहते आहेत..  त्यांनीही विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या आठवणींना उजाळा देत.. संघातील प्रत्येकाचे अनुभव जाणून घेतले..