Pink Ball Test: भारत आणि श्रीलंका (Ind Vs SL) यांच्यात आज बेंगळुरूच्या (Bengaluru) एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर (M.Chinnaswamy Stadium) डे-नाईट कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला आज दुपारी दोन वाजता सुरुवात होईल. आजच्या सामन्यात विजय मिळवून भारताचा श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न असेल. गेल्या पाच वर्षांत एकूण 18 डे-नाईट कसोटी सामने खेळले गेले आहेत. यापैकी दोन तृतीयांश सामने चार किंवा त्याहून कमी दिवसात संपले. 18 पैकी फक्त सहा कसोटी पाच दिवस चालल्या. तर, 12 कसोटी सामन्यांचे निकाल चार किंवा त्याहून कमी दिवसात आले. पिंक बॉल कसोटी सामन्यात मार्नस लाबुशेनं सर्वाधिक शतकं केली आहेत. या यादीत एकमेव भारतीय खेळाडू आहे. 


पिंक बॉल कसोटी क्रिकेट सामन्यात 23 शतक लागली आहेत. या यादीत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेन अव्वल स्थानी आहेत. त्यानं पिंक बॉल कसोटी सामन्यात सर्वाधिक तीन शतक झळकावली आहेत. त्यानंतर पाकिस्तानचा असद शकीफ दोन शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पिंक बॉल कसोटी सामन्यात 20 फलंदाजांनी प्रत्येकी शतक झळकावलं आहे. भारतीय संघातून फक्त विराट कोहली पिंक बॉल कसोटीत शतक झळकावू शकला आहे.


कोहलीने कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध अखेरचं शतक ठोकलं होतं. त्यावेळी त्यानं 136 धावांची खेळी केली होती. तेव्हापासून कोहलीला एकदिवसीय, कसोटी आणि टी-20 या क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावता आलेले नाही. मात्र, बंगळुरू हे त्याचे आयपीएलमधील घरचे मैदान आहे. अशा स्थितीत घरच्या मैदानावर तो शतकाचा दुष्काळ संपवेल, अशी अपेक्षा केली जात आहे. 


भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), मयांक अग्रवाल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जयंत यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शुभमन गिल, उमेश यादव, प्रियांक पंढर , श्रीकर भारत, अक्षर पटेल, सौरभ कुमार. 


श्रीलंकेचा संघ-
दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), निरोशन डिकवेला (विकेटकीपर), लाहिरू थिरिमाने, कुशल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, धनंजय डी सिल्वा, चारिथ असालंका, सुरंगा लकमल, लसिथ एम्बुल्डेनिया, विश्वा फर्नांडो, लाहिरू कुमारा, प्रवीण जयविक्रमा, व्हॅन जयविक्रमा, जेने चंदरे, डी.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha