Babar Azam News : मागील सोमवारी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याचे काही खाजगी चॅट आणि व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करण्यात आले होते. या चॅट्स आणि व्हिडिओंमध्ये फार काही वादग्रस्त नसलं तरी ते खाजगी होतं. तसंच पाकिस्तानच्या कर्णधारावर त्याचा सहकारी क्रिकेटपटूच्या मैत्रिणीसोबत अफेअर असल्याचा आरोप देखील केला जात होता.


दरम्यान हे व्हायरल झालेले चॅट आणि व्हिडिओ बाबर आझमचे आहेत की नाही याबद्दल शंका होती, तसेच विविध आरोपांबाबत कोणतीही स्पष्टता देखील नव्हती. मात्र, मागील काही दिवस सोशल मीडियावर बाबर आझमचीच (Babar Azam Trending on Social Media) चर्चा होताना दिसत होती. काही नेटकरी हे आरोप योग्य असल्याचे सांगत होते आणि बाबरवर टीका देखील करत होते. तर काहीजण बाबरच्या बाजूने पोस्ट करत होते. बाबरवरील या आरोपांशी संबंधित बातम्या अनेक मीडिया प्लॅटफॉर्मवरही चालल्या होत्या. अशीच एक बातमी ऑस्ट्रेलियन मीडिया 'फॉक्स क्रिकेट'वरही चालवली गेली आणि ती ट्वीटरवर शेअर करण्यात आली. ज्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) या ट्वीटच्या उत्तरात आपलं मत देत सर्व टीकाकारांची बोलती बंद केली आहे. ज्यानंतर 'फॉक्स क्रिकेट'ला त्यांचं ट्वीटही डिलीट करावं लागलं, तसंच बाबरशी संबंधित या प्रकरणी पीसीबीने (PCB) आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे.


काय आहे पीसीबीचं म्हणणं?


पीसीबीने आपल्या उत्तराद्वारे बाबर आझमवर लावलेले आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आणि योग्य तपास न करता अशा निराधार बातम्या प्रकाशित केल्याबद्दल मीडिया संस्थांना फटकारलं देखील आहे. पीसीबीने लिहिले की, 'आमचे मीडिया पार्टनर या नात्याने तुम्ही अशा निराधार वैयक्तिक आरोपांकडे दुर्लक्ष करण्याचा विचार केला असावा, हे आरोप असे आहेत ज्यांना बाबर आझमने उत्तर देण्यासही योग्य मानले नाही.'






हे देखील वाचा-