India vs New Zealand ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) पहिल्या एकदिवसीय सामन्याला सुरुवात झाली असून नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने दमदार फलंदाजांना घेऊन खेळण्याचा निर्णय घेतला आहे, हे भारताच्या प्लेईंग 11 वरुन दिसून येत आहे. विशेष म्हणजे न्यूझीलंडचा संघ सध्या एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. त्यात भारताने श्रीलंकेविरुद्धच्या खेळीने क्रिकेट जगतातील मोठा एकदिवसीय विजय नोंदवला आहे. त्यामुळे एक अटीतटीचा सामना आज पाहायला मिळू शकतो. अशात भारताच्या अंतिम 11 बद्दल जाणून घेऊ...


भारताने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील बहुतांश खेळाडू उतरवले आहेत. केएल राहुल आणि अक्षर पटेल वैयक्तिक कारणांमुळे संघाबाहेर आहेत. पण त्यांची जागा भरुन काढण्यासाठी दमदार फलंदाज सूर्यकुमार अष्टपैलू सुंदर, ठाकूर हे संघात आहेत. भारताच्या प्लेईंग 11 चा विचार करता रोहित शर्मा, शुभमन गिलसोबत सलामीला येणार आहे. त्यानंतर विराट, ईशान आणि सूर्यकुमार हे तगडे फलंदाज उतरतील. मग हार्दिक, सुंदर आणि ठाकूर हे अष्टपैलू खेळणार असून गोलंदाजीमध्ये शमी आणि सिराज या वेगवान जोडीसोबत कुलदीप हा फिरकीपटू म्हणून संघात आहे. नेमकी दोन्ही संघाची प्लेईंग 11 कशी आहे पाहूया...


भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी


न्यूझीलंडचा संघ- फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार आणि विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सॅंटनर, हेन्री शिपले, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर






हे देखील वाचा-