India vs New Zealand ODI : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने (Rohit Sharma) एका मोठ्या रेकॉर्डला गवसणी घातली आहे. रोहितनं सामन्यात केवळ 34 धावांचीच खेळी केली असली तरी त्याने षटकारांचा दमदार रेकॉर्ज नावावर केला आहे. रोहितने सामन्यात पहिला षटकार ठोकताच भारतीय भूमीवर एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक षटकारांचा रेकॉर्ड नावावर केला आहे.
रोहितने एकदिवसीय सामन्यांच्या 74 डावांत 124 षटकार ठोकले आहेत. त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) याला मागे टाकलं आहे. धोनी भारतासाठी 123 षटकार ठोकले होते. हैदराबाद येथे सुरु या सामन्यात रोहितने 38 चेंडूंचा सामना करत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 34 धावा केल्या. अशा प्रकारे त्याने भारतात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. रोहितने इंडियामध्ये एकूण 125 एकदिवसीय षटकार मारले आहेत. या बाबतीत धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. धोनीने 123 षटकार मारले आहेत. सचिन तेंडुलकर 71 षटकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे. विराट कोहलीने वनडेत 66 षटकार मारले आहेत. तो चौथ्या क्रमांकावर आहे. युवराज सिंग 65 षटकारांसह पाचव्या स्थानावर आहे.
जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक एकदिवसीय षटकार मारण्याच्या बाबतीत पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी अव्वल स्थानावर आहे. त्याने 398 सामन्यात 351 षटकार मारले आहेत. ख्रिस गेल दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेलने 301 सामन्यात 331 षटकार मारले आहेत. सनथ जयसूर्या तिसऱ्या स्थानावर आहे. जयसूर्याने 445 सामन्यात 270 षटकार मारले आहेत. रोहित चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 239 सामन्यात 265 षटकार मारले आहेत.
भारतामध्ये सर्वाधिक एकदिवसीय षटकार मारणारे खेळाडू -
खेळाडू | षटकार |
रोहित शर्मा | 125 |
महेंद्रसिंह धोनी | 123 |
सचिन तेंडुलकर | 71 |
विराट कोहली | 66 |
युवराज सिंह | 65 |
हे देखील वाचा-