Gujarat Titans : आयपीएल 2025 मेगा लिलाव 24 आणि 25 डिसेंबर रोजी होणार आहे. सर्व संघांनी त्यांच्या कायम ठेवण्याच्या याद्याही जाहीर केल्या आहेत. गुजरात टायटन्सने 5 खेळाडूंना कायम ठेवले आहे. यामध्ये शुभमन गिल, राशिद खान, साई सुदर्शन, राहुल तेवतिया आणि शाहरुख खान यांचा समावेश आहे. गुजरातला लिलावात आरटीएम करण्याची संधी असेल. आयपीएल 2024 मध्ये गुजरातचा संघ चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यांना केवळ पाच सामने जिंकण्यात संघाला यश आले. आता आयपीएल 2025 पूर्वी गुजरात टायटन्सने मोठा निर्णय घेतला असून मुंबई इंडियन्ससाठी विजेतेपद पटकावणाऱ्या पार्थिव पटेलकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
गुजरात टायटन्स संघाने पार्थिव पटेलची सहायक आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. फ्रेंचायझीने बुधवारी ही माहिती दिली. मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा यांच्या नेतृत्वाखालील सपोर्ट स्टाफमध्ये पार्थिव दुहेरी भूमिका बजावेल. गुजरात टायटन्सने पार्थिव पटेलची नवीन सहाय्यक आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा करताना आनंद होत आहे, असे फ्रेंचायझीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पार्थिव पटेल 2020 मध्ये क्रिकेटमधून निवृत्त झाला. आयपीएलमध्ये तो प्रशिक्षकाची भूमिका साकारण्याची ही पहिलीच वेळ असेल. गेल्या तीन हंगामात तो मुंबई इंडियन्ससाठी टॅलेंट स्काऊट म्हणून काम करत होता. ILT20 च्या पहिल्या सत्रात ते MI Emirates चे फलंदाजी प्रशिक्षक देखील होते. त्याच्याकडे अनुभव आहे, जो गुजरात टायटन्स संघाला उपयोगी पडू शकतो.
पार्थिव पटेल आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स, डेक्कन चार्जर्स, आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबादकडून खेळला आहे. 2017 मध्ये त्याने मुंबई संघासाठी आयपीएल ट्रॉफीही जिंकली होती. त्याने 139 आयपीएल सामन्यांमध्ये 2848 धावा केल्या आहेत ज्यात 13 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय 17 वर्षांच्या कारकिर्दीत पार्थिवने भारतासाठी 25 कसोटी, 38 एकदिवसीय आणि काही टी-20 सामने खेळले.
हे ही वाचा -