Rishabh Pant Car Accident: भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत (Rishabh Pant) कारला भीषण अपघात झालाय. दिल्लीहून (Delhi) घरी येत असताना त्याच्या कारला अपघात झालाय. यामध्ये ऋषभ गंभीर जखमी झाल्यानं त्याला तातडीनं देहरादून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कार चालवताना अचानक झोप लागल्यानं कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं पंतनं सांगितलं. यातच ऋषभ पंतच्या अपघातातबाबत आणखी एक महत्वाची माहिती समोर आलीय. अपघातादरम्यान, ऋषभ पंत कारमध्ये एकटाच होता. तसेच पेटत्या वाहनातून बाहेर पडण्यासाठी त्यानं कारची खिडकी तोडली, अशी माहिती उत्तराखंडचे पोलीस महासंचालक अशोक कुमार (Ashok Kumar) यांनी दिलीय. 


अशोक कुमार यांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीत असं म्हटलंय की, "पंत दिल्लीहून घरी परत असताना मंगळूरु आणि निरसन मार्गावर त्याची कार दुभाजकाला धडकली. ज्यामुळं कारनं पेट घेतला. अपघाताच्या वेळी ऋषभ पंत कारमध्ये एकटाच होता आणि पेटत्या कारमधून बाहेर पडण्यासाठी त्यानं कारची खिडकी तोडली." डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतची  प्रकृती स्थिर आहे. पण त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झालीय. ज्यामुळं त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे. 


ट्वीट-






 


पंतच्या अपघातानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे निर्देश
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पंतच्या अपघातानंतर अधिकाऱ्यांना त्याच्या उपचारासाठी सर्व सुविधा पुरवण्याचे निर्देश दिलेत. गरज पडल्यास त्याच्यासाठी एअर अॅम्ब्युलन्सचीही सेवा पुरवा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलंय.


ऋषभ पंतची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द
ऋषभ पंतनं 33 कसोटी, 30 एकदिवसीय आणि 66 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व केलंय. कसोटी क्रिकेटमध्ये पंतच्या नावावर 2 हजार 271 धावांची नोंद आहे. ज्यात पाच शतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकमेव शतकाच्या मदतीनं 865 धावा केल्या आहे. याशिवाय, टी-20 क्रिकेटमध्ये तीन अर्धशतकांसह 987 धावा केल्या आहेत.


हे देखील वाचा-