Mohammed Shami's Injury: भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शामी (Mohammed Shami) दुखापतीमुळे बांगलादेश दौऱ्याला मुकला आहे. दुखापत झाल्यामुळे मोहम्मद शामीला एकदिवसीय मालिकेतून माघार घ्यावी लागली. शामीच्या खांद्याला दुखापत झाली आहे, त्यानं ट्वीट करत याची माहिती दिली. त्याशिवाय बीसीसीयनेही मोहम्मद शामी दुखापतीमुळे खेळणार नसल्याची माहिती दिली. बीसीसीआयनं म्हटलंय की, "मोहम्मद शामीला बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वीच्या सराव सत्रादरम्यान खांद्याला दुखापत झाली. तो सध्या एनसीए, बेंगलोर येथे वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भाग घेऊ शकणार नाही."
मोहम्मद शामीने ट्वीट करत दुखापत आणि उपचाराबद्दल माहिती दिली आहे. शामीनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, दुखापत तुम्हाला प्रत्येक चांगल्या वेळेची आठवण करुन देत राहते. माझ्या करिअरमध्ये अनेकदा दुखापतीचा सामना केलाय. दुखापत तुम्हाला नवी दिशा देते. कितीवेळा दुखापत झाली, त्याने फरक पडत नाही. दुखापतीपासून मी खूप काही शिकलोय आणि आणखी चांगल्या पद्धतीने पुनरागमन केलेय.
पाकिस्तानच्या चाहत्यांनी डिवचलं -
मोहम्मद शामीच्या ट्वीटनंतर पाकिस्तानच्या चाहत्यांनी शोएब अख्तरच्या ट्वीटचा हावाला देत डिवचलं आहे. पाकिस्तानच्या चाहत्यांनी शामीच्या फोटोला रिट्वीट करत करमा लिहेलय. टी 20 विश्वचषक 2022 मधून पाकिस्तानच्या संघाचं आव्हान संपल्यानंतर शोएब अख्तरच्या ट्वीटला रिप्लाय करताना शामीनं करमा असे उत्तर दिले होते. याचीच आठवण पाकिस्तानच्या चाहत्यांनी शामीला करुन दिली.
पाकिस्तानच्या चाहत्यांनी काय म्हटले?
चार डिसेंबर 2022 म्हणजेच रविवारपासून भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. मोहम्मद शामीच्या जागी बीसीसीआयने युवा उमरान मलिकला संघात स्थान दिलेय.
भारताचा एकदिवसीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), शाहबाज अहमद, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर , शार्दुल ठाकूर , मोहम्मद. सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
भारत आणि बांग्लादेश एकदिवसीय सामन्याचं वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 4 डिसेंबर | शेर ए बांग्ला, ढाका |
दुसरा एकदिवसीय सामना | 7 डिसेंबर | शेर ए बांग्ला, ढाका |
तिसरा एकदिवसीय सामना | 10 डिसेंबर | शेर ए बांग्ला, ढाका |
हे देखील वाचा-