England vs Pakistan 2024 : पुढील वर्षी मार्चमध्ये पाकिस्तानमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आयोजित केली जाणार आहे. मात्र याआधीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का बसू शकतो. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात 7 ऑक्टोबरपासून कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. पण वृत्तानुसार, या मालिकेचे मीडिया हक्क अद्याप विकले गेलेले नाहीत. अशा परिस्थितीत पाक-इंग्लंड कसोटी मालिका पाकिस्तानबाहेर प्रसारित केली जाणार नाही. पीसीबीने मीडिया हक्कांसाठी जास्त पैशांची मागणी केली आहे, त्यामुळे आजपर्यंत कोणतीही कंपनीने ते विकत घेतली नाही.


क्रिकेट पाकिस्तानच्या एका बातमीनुसार पीसीबीने तीन वर्षांसाठी मीडिया हक्कांसाठी 21 दशलक्ष डॉलर्सची मागणी केली आहे. भारताच्या दृष्टीने पाहिल्यास ते सुमारे 175 कोटी रुपये असेल. मात्र एवढी रक्कम देण्यासाठी पीसीबीला अद्याप खरेदीदार मिळालेला नाही. दोन पाकिस्तानी कंपन्यांनी संयुक्तपणे 4.1 दशलक्ष डॉलर्सचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र पीसीबीने हक्क विकण्यास नकार दिला. तर विलोआ टीव्हीने $2.25 दशलक्ष ऑफर केले होते. तर स्पोर्ट्स फाईव्ह या परदेशी कंपनीने 7.8 दशलक्ष डॉलर्सचा प्रस्ताव दिला होता. मात्र अद्याप पीसीबीने कुणाला हक्क विकले नाही. जर मीडिया हक्क विकल्या गेले नाही तर पाकिस्तानचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होऊ शकते.


पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात 3 सामन्यांची कसोटी मालिका 


पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात 7 ऑक्टोबरला कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्याचा पहिला सामना मुलतान येथे होणार आहे. याच स्टेडियममध्ये 15 ऑक्टोबरपासून दुसरा सामना खेळवला जाणार आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 24 ऑक्टोबरपासून रावळपिंडीत होणार आहे.


पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या तयारीत


पीसीबीने चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी सुरू केली आहे. पीसीबी स्टेडियम तयार करत आहे. आयसीसीने नुकतेच पाच अधिकाऱ्यांचे पथक पाकिस्तानला पाठवले होते. तयारीचा आढावा घेण्यासाठी ते गेले होते. आयसीसीने पीसीबीसमोर 31 जानेवारी 2025 ही तारीख निश्चित केली आहे. याआधी त्याला सर्व तयारी पूर्ण करायची आहे.


संघाची खराब कामगिरी पीसीबीची डोकेदुखी 


एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 नंतर पाकिस्तान क्रिकेट संघ अद्याप सावरलेला नाही. संघ सतत खराब कामगिरीचा सामना करत आहे. 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. बांगलादेशनेही त्यांच्याच भूमीवर कसोटी मालिकेत त्यांना 2-0 ने पराभूत केले. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नव्या योजनेवर नक्कीच काम करेल.


हे ही वाचा -


Duleep Trophy : ऋतुराज गायकवाडच्या संघाचा पराभव, मयंक अग्रवालच्या संघाने पटकावले दुलीप ट्रॉफी 2024चे विजेतेपद