न्यूयॉर्क : अमेरिकेनं पाकिस्तानला पराभूत करत टी20 वर्ल्ड कपमध्ये मोठा उलटफेर केला. पाकिस्तानला पहिल्याच लढतीत पराभव स्वीकारावा लागल्यानं मोठा त्यांची सुपर-8 वाट खडतर झाली आहे. अमेरिकेच्या नवख्या संघानं अनुभवी पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केलं. यामुळं पाकिस्तानच्या टी20 वर्ल्ड कपमधील मोहिमेला फटका बसण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या खेळाडूंची सैन्यातील भरतीसाठी जसं प्रशिक्षण लागतं तसं प्रशिक्षण दिलं जात होतं. पाकिस्तानी खेळाडूंच्या फिटनेसवर लक्ष दिलं जात होतं. मात्र, अमेरिकेविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानची टी-20 वर्ल्डकपच्या सुपर 8 मधील प्रवेशाची शक्यता अडचणीत आली आहे. 


भारत आणि पाकिस्तान 9 जूनला न्यूयॉर्कमध्ये आमने सामने येणार आहेत. भारताविरुद्ध विजय मिळवणं पाकिस्तानसाठी सोपं असणार नाही. त्यामुळं पाकिस्तान अमेरिकेविरुद्ध पराभव स्वीकारल्यानंतर सुपर-8 मध्ये कसं पोहोचणार हे पाहावं लागणार आहे. 


सुपर-8 चं गणित काय?


टी20 वर्ल्ड कप मध्ये 20 संघांनी सहभाग घेतला आहे. या 20 संघांची विभागणी चार गटांमध्ये करण्यात आली आहे. एका गटात पाच संघ असून सुपर-8 मध्ये प्रवेश त्या संघातील पहिल्या दोन संघांना संधी मिळेल. अ गटात भारत, पाकिस्तान, अमेरिका, कॅनडा, आयरलँड या संघांचा समावेश आहे. अमेरिकेनं दोन मॅच जिंकल्या असल्यानं त्यांच्याकडे चार गुण आहेत. भारतानं एक मॅच जिंकल्यानं दोन गुणांसह ते अ गटात दुसऱ्या स्थानावर आहेत.  पाकिस्तान, कॅनडा आणि आयरलँडला एकाही मॅचमध्ये विजय मिळवता आलेला नाही. 


पाकिस्तानचा सुपर-8 चा मार्ग खडतर


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत 9 जूनला होणार आहे. भारत या गटातील सर्वात मजबूत संघ आहे. भारतानं पहिलं स्थान मिळवून सुपर-8 मध्ये प्रवेश केल्यास  पाकिस्तानला काही करुन दुसरं स्थान मिळवावं लागेल. पाकिस्ताननं राहिलेल्या तीन मॅच जिंकल्या तर त्यांचे सहा गुण होतील. मात्र, त्याचवेळी अमेरिकेला पुढील सर्व मॅचेसमध्ये पराभूत व्हावं लागेल. 


भारताविरुद्ध पराभव झाल्यास पाकिस्तानला सुपर-8 मध्ये संधी मिळेल का? 


भारताविरुद्ध पराभव झाल्यास पाकिस्तानची सुपर-8 ची वाट आणखी बिकट होईल. अमेरिकेनं  राहिलेल्या दोन मॅचेसमध्ये पराभव स्वीकारल्यास त्यांचे गुण 4 राहतील. त्याचबरोबर पाकिस्तानला कॅनडा आणि आयरलँड वर मोठ्या फरकानं विजय मिळवावा लागेल. दुसरीकडे भारताला ग्रुप स्टेजमधील सर्व मॅच जिंकाव्या लागतली. आयरलँड आणि कॅनडा देखील  2 मॅचमध्ये पेक्षा अधिक विजय सामन्यांमध्ये विजय मिळाला नाही पाहिजे. ही स्थिती निर्माण झाल्यास पाकिस्तानला नेट रनरेटच्या  आधारे सुपर-8 मध्ये प्रवेश मिळू शकतो.  


संबंधित बातम्या : 


IND vs PAK : ना टीव्हीचा रिचार्ज, ना सबस्क्रिप्शनची गरज, फक्त एक काम करुन मोबाईलवर भारत पाकिस्तान मॅच मोफत पाहा


मुंबईकर सौरभ नेत्रावळकरपुढे पाकिस्तान चारीमुंड्या चीत, सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेनं लोळवलं! इतिहासातील सर्वात वाईट पराभव