Virat ICC T20 Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीनं (ICC) टी-20 रँकिंग जाहीर केली आहे. या रँकिंगमध्ये भारताच्या दिग्गज फलंदाजांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये विराट कोहली, ऋषभ पंत, ईशान किशन यांची रँकिंग घसरली आहे. दरम्यान या रँकिंगमध्ये केवळ सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा एकमेव भारतीय टॉप 10 मध्ये असून तो दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. आयसीसी रँकिंगमध्ये अव्वलस्थानी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हाच अजूनही विराजमान आहे.


आयसीसीचं ट्वीट-






भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात नुकतीचपाच सामन्यांच्या टी-20 मालिका पार पडली. भारताने 4-1 ने मालिका जिंकली. त्याच मालिकेतील चांगल्या कामगिरीचं फळ सूर्यकुमारला भेटलं असून तो दुसऱ्या स्थानी आहे. सूर्यकुमारच्या खात्यावर 805 गुण असून अव्वलस्थानी असणाऱ्या बाबरच्या नावावर 818 गुण आहेत. दरम्यान भारताचा दिग्गज फलंदाज एकेकाळी अव्वल स्थानी असणारा विराट कोहली आता थेट 32 व्या स्थानी पोहोचला आहे. बराच काळ अधिक टी20 सामने विराट खेळला नसून त्याच्या खात्यावर 528 गुणच आहेत. तर यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा देखील 464 गुणांसह 59 व्या स्थानी आहे.


कशी आहे टॉप 10?


पहिल्या स्थानी पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम 818 गुणांसह आहे. दुसऱ्या स्थानावर भारताचा सूर्यकुमार यादव 805 गुणांसह असून तिसऱ्या स्थानावर पुन्हा पाकिस्तानचा खेळाडू मोहम्मद रिझवान 794 गुणांसह आहे. चौथ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्करम आणि पाचव्या स्थानावर इंग्लंडता डेविड मलान अनुक्रमे 792 आणि 731 गुणांसह विराजमान आहेत. सहाव्या ऑस्ट्रेलियाचा आरॉन फिंच 716 गुणांसह तर सातव्या आणि आठव्या स्थानावर श्रीलंकेचा पाथुम निसंका आणि न्यूझीलंडचा डेवॉन कॉन्वे अनुक्रमे 661 आणि 655 गुणांसह आहेत. तर नवव्या आणि दहाव्या स्थानी वेस्ट इंडीजचा निकोलस पूरन आणि न्यूझीलंडचा मार्टीन गप्टील अनुक्रमे 644 आणि 638 गुणांसह विराजमान आहेत.


हे देखील वाचा-