ICC Champions Trophy 2025 : पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या यजमानपदाचे अधिकार मिळाले आहेत, परंतु बीसीसीआयने पाकिस्तान संघ पाठविण्यास नकार दिला आणि हायब्रिड मॉडेलची मागणी केली, जी पीसीबीने पूर्णपणे नाकारली. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपदही या देशाला गमवावे लागू शकते, असे संकेत पाकिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीवरून पाहिला मिळत आहेत.
आधी टीम हॉटेलमध्ये लागली होती आग...
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये महिलांची राष्ट्रीय स्पर्धा रद्द करण्यात आली होती. टीम हॉटेलला लागलेल्या आगीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आता पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंकेच्या संघालाही परतावे लागले. याचे कारण म्हणजे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये सुरू असलेला हिंसाचार. त्यामुळे हा देश आयसीसी ट्रॉफीच्या यजमानपदासाठी खरोखरच पात्र आहे की नाही, हा प्रश्न पडतो.
पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाने रविवारपासून मुख्य इस्लामाबादकडे निषेध मोर्चा सुरू केला आहे. परिस्थिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पुष्टी केली आहे की, राजधानी इस्लामाबादमधील राजकीय हालचालींमुळे श्रीलंका क्रिकेटशी सल्लामसलत करून पाकिस्तान अ आणि श्रीलंका अ यांच्यातील शेवटचे दोन 50 षटकांचे सामने पुढे ढकलले आहेत. पुढे ढकललेले सामने बुधवार आणि शुक्रवारी रावळपिंडीत खेळवले जाणार होते. पीसीबीने सांगितले की मालिका पूर्ण करण्यासाठी दोन्ही बोर्ड नवीन तारखा निश्चित करण्यासाठी एकत्र काम करतील.
हे दोन्ही सामने 27 आणि 29 नोव्हेंबर रोजी रावळपिंडी क्रिकेट मैदानावर होणार होते. तत्पूर्वी, पाकिस्तान-अ ने सोमवारी इस्लामाबाद येथे झालेल्या पहिल्या सामन्यात पाहुण्या संघाचा 108 धावांनी पराभव करून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. पहिल्या सामन्यात पाकिस्तान अ संघाने फलंदाजी करताना एकूण 306 धावा केल्या, त्याला प्रत्युत्तरात श्रीलंका अ संघ केवळ 198 धावांवर गारद झाला. हैदर अलीने पाकिस्तान-अ साठी उत्कृष्ट शतक झळकावले होते. त्याने 108 धावांची इनिंग खेळली होती. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला प्लेअर ऑफ द अवॉर्ड देण्यात आला.
हे ही वाचा -