Australia vs India 2st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. टीम इंडियाने या मालिकेतील पहिला सामना 295 धावांनी सहज जिंकला. पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या मैदानावरील सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करणारा टीम इंडिया हा जगातील पहिला संघ आहे. या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेत टीम इंडिया आता पर्थहून पुढच्या मिशनसाठी रवाना झाली आहे. टीम इंडिया आपला पुढचा सामना ॲडलेड ओव्हलवर खेळणार आहे. हा पिंक बॉल कसोटी सामना असणार आहे. पिंक बॉल टेस्ट मॅच हा डे-नाईट फॉरमॅटमध्ये खेळला जाणारा कसोटी सामना आहे.


टीम इंडियाने पिंक बॉल मध्ये जास्त कसोटी सामने खेळलेले नाहीत. अशा स्थितीत ॲडलेड ओव्हलवर खेळला जाणारा सामना भारतीय संघासाठी सोपा नसेल. मात्र, टीम इंडियाची एक सुरक्षित बाजू म्हणजे त्यांचे फलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. गोलंदाजीचा प्रश्नच नाही. पिंक बॉल टेस्ट मॅचसाठी टीम इंडिया खास तयारी करणार आहे. त्यामुळे त्यांना 30 नोव्हेंबरला सामना खेळावा लागणार आहे.


भारतीय संघाला पिंक बॉल कसोटी सामनाही जिंकायचा आहे. हा कसोटी सामना 06 डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. याआधी टीम इंडिया पिंक बॉलने 2 दिवसांचा सराव सामना खेळणार आहे. जेणेकरून स्पर्धेची चांगली तयारी करता येईल. हा सामना 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी होणार आहे. भारतीय संघासाठी चांगली गोष्ट म्हणजे टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा परतला आहे आणि रोहित शर्माचे प्लेइंग 11 मध्ये पुनरागमन झाल्याने भारतीय संघ आणखी मजबूत होईल.


कर्णधारसाठी कोण देणार बलिदान? 


अशा परिस्थितीत, रोहितच्या पुनरागमनानंतर कोण बलिदान देणार, म्हणजेच प्लेइंग-11 मधून कोणाला वगळले जाईल, हा मोठा प्रश्न असेल. कसोटी मालिकेपूर्वी शुभमन गिलला वाका येथे सराव करताना बोटाला फ्रॅक्चर झाले होते. याच कारणामुळे तो पहिली कसोटी खेळू शकला नाही. त्याने अद्याप नेटमध्ये सराव सुरू केलेला नाही. गिल दुसऱ्या कसोटीसाठी तंदुरुस्त झाल्यास कर्णधार रोहितला ध्रुव जुरेलला प्लेइंग-11 मधून बाहेर बसवावे लागेल. कारण केएल राहूल त्यांच्या जागी सहा नंबरवर फलंदाजी करेल. 


टीम इंडियाचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीशकुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर