आफगाणिस्तानचे नवाब 59 धावांवर गारद, पाकिस्तानचे गोलंदाज फार्मात
Afghanistan vs Pakistan 1st ODI : आशिया चषकाआधी पाकिस्तानच्या गोलंदाजांनी आग ओकणारी गोलंदाजी केली आहे.
Afghanistan vs Pakistan 1st ODI : आशिया चषकाआधी पाकिस्तानच्या गोलंदाजांनी आग ओकणारी गोलंदाजी केली आहे. हॅरीस रौफ आणि शाहीन आफ्रिदी यांनी भेदक मारा केला. पाकिस्तानच्या गोलंदाजीपुढे आफगाणिस्तानच्या संपूर्ण संघाचा 59 धावांत खुर्दा उडाला. पाकिस्तानच्या संघाला आफगाणिस्तानने 201 धावांत तंबूत पाठवले होते. आफगाणिस्तान हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते. पण हॅरीस रौफच्या गोलंदाजीपुढे आफगाण फलंदाजांनी नांगी टाकली. हॅरीस रौफ याने अवघ्या 18 धावांत आफगाणिस्तानचा अर्धा संघ तंबूत धाडला. आफगाणिस्तानच्या पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. त्याशिवाय फक्त दोन फलंदाजांना दुहेरी धावसंख्या पार करता आली. पाकिस्तानने पहिल्या वनडे सामन्यात 142 धावांनी विजय मिळवला. तीन सामन्याच्या वनडे मालिकेत पाकिस्तानने 1-0 ने आघाडी घेतली.
पाकिस्तानने दिलेले 202 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना आफगाणिस्तान संघाची दैना उडाली. अवघ्या 48 धावांत आफगाणिस्तानचे सात फलंदाज बाद झाले होते. गुरबाज याने आफगाणिस्तानकडून सर्वाधिक धावांची खेळी केली. गुरबाज याने 47 चेंडूत 18 धावांची खेळी केली. Azmatullah Omarzai याने 12 चेंडूत 16 धावांची खेळी केली. या दोघांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या पार करता आली नाही.
पाकिस्तानकडून हॅरिस रौफ याने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. रौफ याने 6.2 षटकात 18 धावांच्या मोबदल्यात पाच फलंदाजांना तंबूत धाडले. तर शाहीन आफ्रिदी याने 4 षटकात 9 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. नसीम शाह आणि शादाब खान यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.
Shaheen: 4-2-9-2
— Johns. (@CricCrazyJohns) August 22, 2023
Naseem: 5+0-12-1
Haris: 6.2-2-18-5
Pakistan pace trio destroyed Afghanistan as they bundled out for just 59 runs. pic.twitter.com/vmL99IyNir
Haris Rauf won the Player of the match for taking a five-wicket haul.
— Johns. (@CricCrazyJohns) August 22, 2023
- Pakistan were defending 201 runs. pic.twitter.com/UbH0UlnaYO
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानचीही अवस्था कठीण झाली. आफगाण माऱ्यापुढे दिग्गज ढेपाळले. कर्णधार बाबर आझम याला तर खातेही उघडता आले नाही. फखर जमान दोन धावांवर तंबूत परतला. मोहम्मद रिझवान 21 धावांचे योगदान देऊ शकला. हम्बनटोटा येथे सुरु असलेल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानची टॉप ऑर्डर अपयशी ठरली. अवघ्या 62 धावांत पाकिस्तानचे आघाडीचे चार फलंदाज तंबूत परतले. फखर जमान 02, बाबर आझम 00, आगा सलमान 07 आणि मोहम्मद रिजवान 21 धावा काढून बाद झाले. इमाम उल हकचा अपवाद वगळता एकाही खेळाडूला अर्धशतक ठोकता आले नाही. इमाम उल हक याने 61 धावांची खेळी केली. हम्बनटोटा येथील पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण आफगाणिस्तानच्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. इमामचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. पाकिस्तानचा संपूर्ण संघ 201 धावांत तंबूत परतला.