Asia Cup 2022 : आशिया चषकासाठी(Asia Cup) पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB)  15 सदसीय संघाची घोषणा केली आहे. बाबर आझमकडे (Babar Azam) संघाचं नेतृत्व असून शादाब खानकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे अनुभवी शोएब मलिक आणि अष्टपैलू हसन अली यांना संघात स्थान देण्यात आलेलं नाही. दोन्ही खेळाडू युएईमध्ये झालेल्या टी 20 विश्वचषकात पाकिस्तान संघाचे सदस्य होते. 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान युएईमध्ये आशिया चषकाचा थरार रंगणार आहे.  

आशिया चषकासाठी पाकिस्तानचा संघ (Pakistan squad for ACC T20 Asia Cup) -  बाबार आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार),असिफ अली, फखर जमान, हैदर अली, हॅरीस रौफ, इफ्तीखार अहमद, खुशदील शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वासिम जेएनआर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शहनवाज दहानी आणि इस्मान कदीर

27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर आशिया चषक 

आशिया खंडासाठीची सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा आशिया कप 2022 (Asia Cup 2022) लवकरच पार पडणार अशी माहिती समोर येत होती.पण या स्पर्धेचं वेळापत्रक समोर आलं आहे. 27 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामन्याने स्पर्धेची सुरुवात होणार असून 11 सप्टेंबर रोजी अंतिम सामना पार पडणार आहे. भारताचा पहिलाच सामना 28 ऑगस्ट रोजी पाकिस्तान विरुद्ध असेल. यंदा आशिया कपमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान हे पाच देश एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. नेमकं आशिया चषकाचं वेळापत्रक कसं आहे पाहूया.. 

सामना दिवस दिनांक संघ ग्रुप  ठिकाण 
1 शनिवार 27 ऑगस्ट अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका बी दुबई
2 रविवार 28 ऑगस्ट भारत विरुद्ध पाकिस्तान दुबई
3 मंगळवार 30 ऑगस्ट बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान  बी शारजाह
4 बुधवार 31 ऑगस्ट भारत विरुद्ध पात्र संघ दुबई
5 गुरुवार 1 सप्टेंबर श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश  बी दुबई
6 शुक्रवार 2 सप्टेंबर पाकिस्तान विरुद्ध पात्र संघ शारजाह
7 शनिवार 3 सप्टेंबर ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 शारजाह
8 रविवार 4 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 सुपर 4 दुबई
9 मंगळवार 6 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 1 सुपर 4 दुबई
10 बुधवार 7 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 2 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 दुबई
11 गुरुवार 8 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 दुबई
12 शुक्रवार 9 सप्टेंबर ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 सुपर 4 दुबई
13 रविवार 11 सप्टेंबर सुपर 4 पात्र 1 विरुद्ध सुपर 4 पात्र 2 सुपर 4 दुबई