India vs Zimbabwe Live : भारत आणि झिम्बाब्वे (India vs Zimbabwe) यांच्यात सुरु तीन सामन्यांची मालिका भारताने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून आपल्या नावे केली आहे. मात्र मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना (3rd ODI) उद्या अर्थात सोमवारी (22 ऑगस्ट) खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकल्यास भारताला मालिकेत झिम्बाब्वेला व्हाईट वॉश देण्याची संधी आहे. तर दुसरीकडे झिम्बाब्वे अखेरचा सामना जिंकून किमान मालिकेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न करेल.
तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने 10 गडी राखून जिंकला. तर दुसऱ्या सामन्यातही 5 विकेट्सने भारताने विजय मिळला आहे. दोन्ही सामन्यात आधी दमदार गोलंदाजीसह नंतर उत्तम अशी फलंदाजी देखील भारताने केली. तर मालिकेतील अखेरचा हा सामना कधी, कुठे पाहता येईल याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...
कधी आहे सामना?
उद्या 21 ऑगस्ट रोजी भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी सामना सामना सुरु होईल.
कुठे आहे सामना?
हा सामना हा सामना हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येणार आहे. तसंच सोनी लिव्ह (Sony LIV) अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे लाईव्ह कव्हरेज पाहता येईल.
कसे आहेत दोन्ही संघ?
भारताचा संघ:
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर, शाहबाझ अहमद.
झिम्बाब्वेचा संघ:
रेगीस चकाब्वा (कर्णधार), रायन बुर्ल, तनाका चिवांगा, ब्रॅडली इवांस, ल्यूक जाँगवे, इनोसंट काया, ताकूदझ्वँनशी केईतानो, क्लाईव्ह मडांडे (यष्टीरक्षक), वेस्ली मॅदवेर, तदीवांशे मरुमानी, जॉन मसारा, टोनी मुनयोंगो, रिचर्ड येनगारावा, व्हिक्टर एनवायुची, सिकंदर रझा, मिल्टन शुम्बा, डोनाल्ड तिरीपानो.
हे देखील वाचा-