Most Sixes in Test Cricket: पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या (Pakistan vs England) दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सनं (Ben Stokes) विश्वविक्रमाला गवसणी घातलीय. या सामन्यातील दुसऱ्या डावात बेन स्टोक्सनं 41 धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली. ज्यात एका षटकाराचा समावेश होता. या षटकारासह बेन स्टोक्सनं न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ब्रेंडन मॅक्युलम (Brendon McCullum) वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी साधलीय. दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या विजयानंतर दुसऱ्या सामन्यात जिंकून मालिका जिंकण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल.


ट्वीट-






 


कसोटी क्रिकेटमधील षटकारांची नोंद
न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमनं त्याच्या कारकिर्दीतील 101 कसोटी सामन्यांमध्ये 107 षटकार मारले. बेन स्टोक्सच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकाराची नोंद आहे. स्टोक्सनंही 107 षटकार मारले असून मॅक्युलमच्या विक्रमाची बरोबरी केली. या दोन फलंदाजांव्यतिरिक्त केवळ ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज अॅडम गिलख्रिस्ट (100) यानेच कसोटीत 100 किंवा त्याहून अधिक षटकार मारले आहेत. टीम साऊथी 75 षटकारांसह या यादीत तिसऱ्या क्रमाकांवर आहे. 


पाकिस्तानसमोर 355 धावांचं लक्ष्य
सलग विकेट्स पडूनही इंग्लंडनं दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 281 धावा केल्या. पाकिस्तानकडून कसोटी क्रिकेटचा पदार्पणाचा सामना खेळणारा अबरार अहमदनं सात विकेट घेतल्या. यानंतर इंग्लंडचा गोलंदाजा जॅक लीचनं चार विकेट घेत पाकिस्तानचा पहिला डाव 202 धावांवर गुंडाळला. दुसऱ्या डावातही इंग्लंडच्या विकेट पडत होत्या. पण बेन डकेटनं 79 आणि हॅरी ब्रूकनं 108 धावा करत संघाला 275 धावांपर्यंत पोहचवलं. पाकिस्तानला सामना जिंकण्यासाठी 355 धावांचं लक्ष्य मिळालंय.


इग्लंडचा संघ 1-0 नं आघाडीवर
तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडच्या संघानं 74 धावांनी विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडच्या संघानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात अनेक विक्रम पाहायला मिळाले. पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्याच डावात इंग्लंडच्या चार फलंदाजांनी प्रत्येकी चार शतक झळकावले.


हे देखील वाचा-