IND vs BAN 3rd ODI: ईशान किशनच्या (Ishan Kishan) वादळी द्विशतक आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) शतकानंतर शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) आणि अक्षर पटेलच्या (Axar Patel) भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतानं तिसरा आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात 227 धावांनी विजय मिळवला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघानं बांगलादेशसमोर 410 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत बांगलादेशच्या संघाला अवघ्या 182 धावांवर रोखलं. 


ट्वीट-






भारताची भेदक गोलंदाजी
दरम्यान, 410 धावांच्या लक्ष्य रोखण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजांचे हात बांधून ठेवले. 50 धावांच्या आत बांगलादेशच्या दोन फलंदाजांना माघारी धाडून भारतानं सामन्यावर मजबूत पकड बनवली. बांगलादेशकडून ऑलराऊंडर शाकीब अल हसननं सर्वाधिक 45 धावांची खेळी केली. कुलदीप यादवनेच त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. शाकीब व्यतिरिक्त बांगलादेशच्या कोणत्याही फलंदाजाला जास्त वेळ क्रिजवर टिकता आलं नाही. या मालिकेतील दोन्ही सामन्यात भारतासाठी विलन ठरलेला मेहंदी हसनला उमरान मलिकनं स्वस्तात माघारी धाडलं. बांगलादेशचा संघ 34 व्या षटकात 182 धावांवर ढेपाळला. भारताकडून शार्दूल ठाकूरनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, अक्षर पटेल आणि उमरान मलिकनं प्रत्येकी दोन-दोन विकेट्स मिळवल्या. याशिवाय, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टनच्या खात्यात प्रत्येकी एक-एक विकेट जमा झाली.


ईशान किशन- विराटकडून बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. भारताला 4.1 षटकात सलामीवीर शिखर धवनच्या रुपात पहिला धक्का लागला. मात्र, त्यानंतर ईशान किशन आणि विराट कोहलीनं भारताचा डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी मोठी भागिदारी रचत भारताची धावसंख्या 300 पार पोहचवण्यात मदत केली.  भारताच्या डावातील 36 षटकातील अखेरच्या चेंडूवर ईशान किशन आऊट झाला. एका बाजूनं पाठोपाठ विकेट पडत असताना विराट कोहलीनं संघाची दुसरी बाजू संभाळून ठेवली. या सामन्यात श्रेयस अय्यर (3 धावा) आणि कर्णधार केएल राहुल (8 धाव करून बाद झाला.  त्यानंतर 41व्या षटकात विराट कोहलीदेखील शाकीब अल हसनच्या गोलंदाजीचा शिकार झाला. भारतानं निर्धारित 50 षटकात 8 विकेट गमावून बांगलादेशसमोर 410 धावांचं लक्ष्य ठेवलं. बांगलादेशकडून तस्कीन अहमद, हुसेन आणि शाकीब अल हसननं प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तर, मुस्ताफिजुर रहमान आणि मेहंदी हसनच्या खात्यात एक-एक विकेट जमा झाली.


हे देखील वाचा-