Pakistan vs Bangladesh 1st Test Shan Masood : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना रावळपिंडी येथील पिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या कसोटी सामन्यात पाकिस्तानची स्थिती खुपच खराब दिसत आहे. पाकिस्तानने पहिल्या डावात 448 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशनेही चोख प्रत्युत्तर देत 500 हून अधिक धावा केल्या. बांगलादेशला या चांगल्या स्थितीत नेण्याचे श्रेय संघाचा अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमला जाते, ज्याने 191 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली.


यादरम्यान, मुशफिकर रहीमलाही जीवदान मिळाले. सलमान आघाच्या चेंडूवर बाबर आझमने त्याचा झेल सोडला होता. त्यावेळी मुशफिकुर 150 धावांवर खेळत होता आणि बाबर आझमने स्लिपमध्ये त्याचा झेल सोडला. यानंतर मुशफिकुरने 341 चेंडूत 22 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 191 धावा करत संघाला आघाडी मिळवून दिली. 


बाबर आझमने झेल सोडल्यानंतर कर्णधार शान मसूद चांगलाच संतापलेला दिसत होता. त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो ड्रेसिंग रूममध्ये मुख्य प्रशिक्षक जेसन गॅलेस्पीशी रागात बोलत आहे. बाबर आझमच्या ड्रॉप कॅचने शान मसूदला राग आल्याचे चाहत्यांचे मत आहे. तुम्हीही हा व्हिडिओ पहा.....






पाकिस्तानने पहिला डाव 6 बाद 448 धावा करून घोषित केला. कर्णधार शान मसूदने अत्यंत धाडसी निर्णय घेत बांगलादेशला ऑलआऊट न करता फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशने 53 धावांवर 2 विकेट गमावल्याने त्याचा निर्णय योग्य ठरल्याचे दिसत होते, पण त्यानंतर शादमान इस्लामने 93 आणि मुशफिकर रहीमने 191 धावा करत बांगलादेशला मजबूत स्थितीत आणले. लिटन दास आणि मोमिनुल हक यांनीही अर्धशतकी खेळी खेळली.


जर पाकिस्तान संघ हा सामना हरला किंवा सामना अनिर्णित राहिला तर त्यांची जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाण्याची शक्यता पूर्णपणे नष्ट होईल. म्हणजेच पाकिस्तानचे अंतिम फेरीत जाण्याचे स्वप्न भंगणार आहे.