Pakistan vs Bangladesh 1st Test : बांगलादेश संघाचा माजी कर्णधार शकिब अल हसनला मैदानावर खेळाडू आणि पंचांशी गैरवर्तन करताना आपण अनेकदा पाहिले आहे. दरम्यान, पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीदरम्यान पुन्हा एकदा शाकिबचा राग पाहायला मिळाला. रावळपिंडी कसोटीच्या पाचव्या दिवशी शकीब पाकिस्तान संघाचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानवर चेंडू फेकताना दिसला.
खरं तर झाले असे की, पाकिस्तान संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना ३३ व्या षटकात शाकिब गोलंदाजी करत होता. त्यावेळी बांगलादेशला पहिला सामना जिंकण्यासाठी पटकन विकेट घेण्याची गरज होती. पण मोहम्मद रिजवान शाकिबला खेळण्यासाठी खूप वेळ घेत होतो.
दरम्यान, रिझवान तयार नव्हता आणि तोपर्यंत शाकिबने त्याचा रनअप घेतला. त्यानंतर तो थांबला नाही आणि रागाने चेंडू रिझवानच्या दिशेने फेकला. पण सुदैवाने या चेंडूने कोणालाही दुखापत झाली नाही. तो चेंडू नंतर यष्टीरक्षक लिटन दासने झेलला. शाकिबची ही कृती पाहून अंपायरही चकित झाले.
शाकिबची ही शैली अंपायरला अजिबात आवडली नाही. त्यांनी शाकिबला चेतावणीही दिली. पण नंतर शाकिब माफी मागताना दिसला. या घटनेचा व्हिडिओही X वर शेअर करण्यात आला आहे.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा 10 गडी राखून पराभव केला आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने पहिल्या डावात 6 बाद 448 धावा करून डाव घोषित केला. प्रत्युत्तरात बांगलादेशने 565 धावा केल्या आणि 117 धावांची आघाडी घेतली. बांगलादेशने दुसऱ्या डावात पाकिस्तानला 146 धावांत गुंडाळले. बांगलादेशने 30 धावांचे लक्ष्य 10 गडी राखून पूर्ण केले. मुशफिकर रहीमला त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
2021 मध्ये रावळपिंडीमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानने घरच्या भूमीवर एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. दरम्यान, पाच सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले तर चार सामने अनिर्णित राहिले. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून रावळपिंडी येथे खेळवला जाणार आहे.
हे ही वाचा :