Mumbai Cricket Association Head Coach & Academy in Charge : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (Mumbai Cricket Association) मुख्य प्रशिक्षकपदी (MCA Head Coach) ओमकार साळवी (Pmkar Salvi) तर, एमसीए प्रभारी (MCA Academy In-Charge ) म्हणून समीर दिघे (Sameer Dighe) यांची निवड करण्यात आली आहे. ओमकार साळवी सध्या आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचा सह सहाय्यक गोलंदाजी प्रशिक्षक आहेत.  आगामी हंगामासाठी देशांतर्गत मुंबई वरिष्ठ पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून ओमकार साळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


मुख्य प्रशिक्षकपदी ओमकार साळवी तर, प्रभारी समीर दिघे


एमसीएचे हेड कोच म्हणून ओमकार साळवी यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) अकादमीचे प्रभारी म्हणून समीर दिघे यांची नियुक्ती करण्यात आली असून विनायक माने यांना फलंदाजी प्रशिक्षक तर प्रदीप सुंदरम आणि मंदार साने यांना गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. सुनील लिंगायत यांची क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


भारताचे माजी फलंदाज लालचंद राजपूत यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सुधार समितीने (CIC) साहिल कुकरेजा आणि प्रीती डिमरी इतर सदस्यांसह या नियुक्त्या केल्या आहेत. सोमवारी या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.






ओमकार साळवी यांना 41 वेळा रणजी करंडक विजेते अमोल मुझुमदार यांच्या जागी मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. कोलकाता संघाआधी साळवी यांनी मुंबई संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केलं आहे. ओमकार साळवी भारताचा वेगवान गोलंदाज आविष्कार साळवीचे मोठे बंधू आहेत. ओमकार यांनी देशांतर्गत क्रिकेटमधील एकदिवसीय सामन्यात रेल्वे संघाचं प्रतिनिधित्व केलं. देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. 


मुंबईचे माजी फलंदाज विनित इंदुलकर यांची मुंबई वरिष्ठ पुरुष संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, माजी यष्टिरक्षक-फलंदाज ओंकार गुरव यांची क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


IPL 2023 : MI च्या अडचणीत वाढ! जोफ्रा आर्चर आयपीएलमधून 'आऊट', इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मुंबईच्या ताफ्यात