IPL 2023, KKR vs PBKS : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात कोलकात्याने थरारक विजय मिळवला. अखेरच्या दोन चेंडूत 26 धावांची गरज होती. 19 व्या षटकात आंद्रे रसेल याने तीन षटकार लगावत कोलकात्याच्या विजयाच्या आशा उंचावल्या. पण अखेरच्या षटकात सहा धावांची गरज असताना अर्शदीप याने भेदक मारा केला.. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेला थरार कोलकात्याने जिंकला. पण अर्शदीप याच्या गोलंदाजीचेही कौतुक केलेय जातेय. रिंकू सिंहने अखेरच्या चेंडूवर चौकार लगावत कोलकात्याला विजय मिळवून दिला. दोन चेंडूत दोन धावांची गरज असताना आंद्रे रसेल धावबाद झाला.. त्यामुळे रिंकूवर दबाव होता.. पण रिंकूने दबाव न घेता अर्शदीपच्या अखेरच्या चेंडूवर चौकार लगावत कोलकात्याला विजय मिळवू दिला.


दोन षटकात 26 धावांची गरज होती. शिखर धवन याने चेंडू सॅम करन याच्या हातात सोपवला. सर्वात महागड्या गोलंदाजाने 19 वे षटक महागडे फेकले. पाहूयात या षटकात काय झाले.. 


18.1 -  रिंकू सिंह याने एक धाव घेतली


18.2 - आंद्रे रसेल याने खणखणीत षटकार लगावला


18.3 - पुन्हा एकदा आंद्रे रसेल याने षटकार लगावला...


18.4 - निर्धाव चेंडू


18.5 - आंद्रे रसेलयाने बाऊन्स चेंडूवर जबरदस्त षटकार लगावला....


18.6 - आंद्रे रसेल याने बाऊन्सवर एक धाव घेतली..


सॅम करन याने फेकलेल्या 19 व्या षटकात आंद्रे रसेल याने  20 धावा काढल्या... 


अखेरच्या षटकात अर्शदीप सिंह याने भेदक मारा केला. अर्शदीप सिंह याने जिगरबाजपणे गोलंदाजी करत सहा धावांसाठी आंद्रे रसेल आणि रिंकू सिंह यांना अखेरपर्यंत झुंजवले... पाहूयात अखेरच्या षटकातील थरार


19.1 - अर्शदीपचा चेंडू आंद्रे रसेल याला समजलाच नाही. या चेंडूवर कोणताही धाव निघाली नाही. 


19.2 - आंद्रे रसेल याने एक धाव घेतली. 


19.3 - रिंकू सिंह याने षटकार मारण्याचा प्रयत्न केला. पण अर्शदीप सिंग याने जबरदस्त चेंडू टाकला.. रिंकूला फक्त एक धाव घेता आली. 


19.4 - 139 किमी वेगाने फेकलेला चेंडू रसेल याने आऊटसाईड ऑफला मारला.. या चेंडूवर रसेल याने दोन धावा घेतल्या...


19.5 - दोन चेंडूवर दोन धावांची गरज होती.. रसेल फलंदाजी करत होता. अर्शदीप याने वाइड यॉर्कर फेकला... चेंडू विकेटकिपर जितेश शर्माच्या हातात गेला... त्यानंतर रसेल आणि रिंकू यांनी धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण रसेल धावबाद झाला.. 


19.6 - अखेरच्या चेंडूवर दोन धावांची गरज होती.. अर्शदीप याने यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू फुलटॉस पडला. या चेंडूवर रिंकूने खणखणीत चौकार मारत कोलकात्याला विजय मिळवून दिला. 


नीतीश राणा याने कर्णधाराला साजेशी खेळी केली. नीतीश राणा याने 38 चेंडूत 51 धावांचे योगदान दिले. रामा याने या खेळीत सहा चौकार आणि एक षटकार लगावला. नीतीश राणा बाद झाल्यानंतर आंद्रे रसले याने स्वर्व सुत्रे आपल्या हातात घेतली. आंद्रे रसेल याने रिंकूच्या साथीने कोलकात्याला विजायाकडे नेले. अखेरच्या षटकात दोन चेंडूवर दोन धावांची गरज असताना रसेल धावबाद झाला. रसेल याने 23 चेंडूत तीन षटकार आणि तीन चौकाराच्या मदतीने 42 धावांचे योगदान दिले. रसेल बाद झाल्यानंतर रिंकूने चौकार लगावत कोलकात्याला विजय मिळवून दिला. रिंकूने 10 चेंडूत एक षटकार आणि दोन चौकार लगावत विजयी खेळी केली. रिंकू सिंह पुन्हा एकदा कोलकात्याच्या मदतीला धावून आला.