NZ vs SL, 2nd Test : श्रीलंका संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर (Sri Lanka Tour of New Zealand) आहे. दोन कसोटी सामन्यांची (Test Cricket) मालिका सुरु आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात (SL vs NZ) झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने 2 विकेट्सने रोमहर्षक विजय मिळवला. ज्यानंतर आता दुसरा कसोटी (NZ vs SL 2nd Test) सामना वेलिंग्टन येथे सुरु आहे. सामन्याचा पहिला दिवस संपताना न्यूझीलंडनं 2 गडी गमावत 155 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत. यावेळी सलामीवीर डेवॉन कॉन्वे यानं केलेल्या 108 चेंडूतील 78 धावा संघासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत.


सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकून श्रीलंका संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. ज्यानंतर पहिल्या दिवशी त्यांनी तशी सुमार गोलंदाजी केली. सलामीवीर लॅथम 21 धावला करुन स्वस्तात माघारी परतला. पण डेवॉन कॉन्वेन केन विल्यमसनसोबत एक चांगली भागिदारी केली. कॉन्वे याने 108 चेंडूत 13 चौकार ठोकत 78 धावा केल्या त्यानंतर त्याला डि सिल्वाने बाद केलं खरं पण त्याच्या 78 धावा संघासाठी फार महत्त्वाच्या ठरल्या. दरम्यान दिवस संपताना केन विल्यमसन नाबाद 26 तर हेन्री निकोल्स नाबाद 18 धावांवर खेळत आहे. 






सलामीच्या कसोटी न्यूझीलंडचा रोमहर्षक विजय


न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेच्या (Team Sri Lanka) संघाने पहिले दोन दिवस वर्चस्व गाजवले. यानंतर तिसऱ्या दिवशी किवी संघाचा वरचष्मा होता. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या दिवशी दोन्ही संघांमध्ये बरोबरीची लढत झाली. श्रीलंकेने न्यूझीलंडला विजयासाठी 285 धावांचे लक्ष्य दिले होते, जे न्यूझीलंडने शेवटच्या चेंडूवर 8 विकेट्स गमावून पूर्ण केले.


भारताला झाला मोठा फायदा


पहिल्या सामन्याच्या अखेरच्या डावात न्यूझीलंड संघाचा माजी कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) याने ठोकलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर किवी संघाने विजय मिळवला होता. विशेष म्हणजे या विजयाचा थेट फायदा भारतीय संघाला झाला असून भारत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. श्रीलंकेचा संघ पराभूत झाल्यामुळे WTC फायनलच्या गुणतालिकेत खालच्या स्थानावर गेल्यामुळे भारत फायनलसाठी पात्र ठरला आहे.


हे देखील वाचा-