Former Australian Captain Tim Paine Retirement : ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटी कर्णधार टिम पेनने (Tim Paine) देशांतर्गत क्रिकेटच्या (Domestic Cricket) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तस्मानिया आणि क्वीन्सलँड यांच्यात झालेल्या सामन्यानंतर शुक्रवारी (17 मार्च) त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटला अलविदा केला. यावेळी टिम पेन भावूक झालेला दिसून आला. यावेळी त्याच्या संघातील खेळाडूंनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. तस्मानिया आणि क्वीन्सलँड यांच्यात खेळलेला हा सामना अनिर्णित राहिला. त्याच्या शेवटच्या प्रथम श्रेणी सामन्यात त्याने पहिल्या डावात 62 चेंडूत 42 धावा केल्या होत्या. आणि दुसऱ्या डावात 3 धावांवर नाबाद राहिला. टिम पेनने 2005 साली दक्षिण ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
सर्वोत्कृष्ट ऑस्ट्रेलियन कसोटी यष्टीरक्षकांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्या टिम पेनने 2021 मध्ये अॅशेस सुरु होण्याच्या एक आठवडा आधी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. पेन ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार होता, पण काही खाजगी कारणांमुळे तो हे करु शकला नाही आणि त्याने आणि मालिकेतून माघार घेतली. टिम पेनच्या राजीनाम्यानंतर पॅट कमिन्सने कसोटी कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली आणि ऑस्ट्रेलियाला अॅशेस जिंकून देखील दिले होते. 2018 मध्ये बॉल-टेम्परिंग प्रकरणावरुन वरिष्ठ राष्ट्रीय संघात गोंधळ सुरु असताना टिम पेनने ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार म्हणून पदभार स्वीकारला. पेनने स्टीव्ह स्मिथच्या जागी कर्णधार म्हणून काम केले आणि ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय संघाचा कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केली.
टिम पेनची कारकीर्द
पेनने ऑस्ट्रेलियासाठी 35 कसोटी सामने खेळले, त्यापैकी 23 कसोटी सामन्यांमध्ये त्याने नेतृत्व केले. उल्लेखनीय म्हणजे, जेव्हा भारताने 2018-19 मध्ये त्यांची पहिली कसोटी मालिका जिंकली तेव्हा पेन हा कसोटी संघाचा कर्णधार होता आणि जेव्हा भारताने 2020-21 मध्ये गाब्बा किल्ल्याचा भंग केला तेव्हा सलग दुसरा मालिका विजय पूर्ण केला. पेनचा कसोटी कर्णधार म्हणून चांगला रेकॉर्ड होता, त्याने 23 पैकी 11 सामने जिंकले आणि फक्त 8 गमावले.
पेनच्या नावावर आहे खास रेकॉर्ड
तस्मानियासाठी देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम टिम पेनच्या नावावर आहे. त्याने तस्मानियासाठी यष्टीरक्षक म्हणून 295 झेल घेतले आहेत. टीम पेनने ऑगस्ट 2022 मध्ये क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. यापूर्वी त्याने मानसिक आरोग्याचे कारण देत क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला होता. 2022-23 हंगामात देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने 7 सामने खेळले आणि 156 धावा करण्यात यश मिळवले. यादरम्यान त्याची सरासरी 17.33 होती. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या 4 हजारांहून अधिक धावा आहेत. तस्मानियाच्या 2 विजेतेपदांमध्ये त्याचा सहभाग होता.
हे देखील वाचा-