Ireland vs New Zealand: तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंडच्या संघ आयर्लंड दौऱ्यावर गेलाय. या मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं एक विकेट्सनं विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, आयर्लंडच्या संघानं दिलेल्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघानं अखेरच्या षटकात 24 धावा ठोकून विश्वविक्रम नोंदवला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अखेरच्या षटकात 24 धावा करणारा न्यूझीलंड पहिला संघ ठरला आहे.
आयर्लंडविरुद्ध डबलिनच्या द व्हिलेज स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी गोलंदाजी निर्णय घेतला. त्यानंतर आयर्लंडनं 50 षटकात 9 विकेट्स गमावून न्यूझीलंडसमोर 301 धावांचं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडनं 49 षटकांत 9 विकेट्स गमावून 281 धावा केल्या. या सामन्यातील शेवटच्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी 20 धावांची गरज होती आणि लॉकी फर्ग्युसन, मायकेल ब्रेसवेल क्रीजवर होते.
ब्रेसवेलची तुफानी फटकेबाजी
आयर्लंडकडून शेवटचं षटक टाकण्यासाठी क्रेग यंग गोलंदाजी करण्यासाठी आला. परंतु, ब्रेसवेलनं तुफानी फटकेबाजी करत पाच चेंडूतच न्यूझीलंडच्या संघाला विजय मिळवून दिला. ब्रेसवेलनं पहिल्या दोन चेंडूंवर सलग दोन चौकार, तिसऱ्या चेंडूत एक षटकार, चौथ्या चेंडूवर चौकार आणि पाचव्या चेंडूवर षटकार मारून न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. अशा प्रकारे न्यूझीलंडनं शेवटच्या षटकात 24 धावा झाल्या. ब्रेसवेल 82 चेंडूत 127 धावा करून नाबाद माघारी परतला.
न्यूझीलंडची मालिकेत 1-0 अशी आघाडी
आंतराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये अखरेच्या षटकात सर्वाधिक धा ठोकण्याचा विक्रम अफगाणिस्तानच्या नावावर होता. अफगाणिस्तानच्या संघानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 20 धावा करून विश्वविक्रम रचला होता. आयर्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना 12 जुलै रोजी खेळला जाईल. या सामन्यात विजय मिळवून न्यूझीलंडचा संघ मालिकेवर कब्जा करण्यासाठी मैदानात उतरले. तर, दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेतील आव्हान टिकवण्याचा आयर्लंडचा प्रयत्न असेल.
हे देखील वाचा-
- Rohit Sharma Tweet: रोहित शर्माची भविष्यवाणी ठरतेय खरी, 10 वर्षापूर्वी सूर्यकुमारबाबत केलेलं ट्वीट होतंय व्हायरल
- IND vs ENG 3rd T20: रोहित शर्मानं सूर्यकुमारचं कौतूक तर केलंच! पण पराभवाचंही सांगितलं कारण
- ENG vs IND: 'विचार करूनच निर्णय घेतले जातात' विराटच्या खराब फॉर्मवर रोहित शर्माची मोठी प्रतिक्रिया