NZ vs BAN : क्रिकेटमध्ये आज (दि.27) पुन्हा एकदा उलटफेर पाहायला मिळाला आहे. बांगलादेशने (Bangladesh) परदेशात जात न्यूझीलंडचा 5 विकेट्सने धुव्वा उडवला. मेहंदी हसनच्या (Mehendi Hasan) दमदार कामगिरीच्या जोरावर बांगलादेशने हा विजय मिळवला. मेहंदीने अष्टपैलू कामगिरी करत हा विजय खेचून आणला आहे. हा सामना न्यूझीलंडमधील नेपियरच्या मैदानावर खेळवण्यात आला होता. बांगला देशने  न्यूझीलंडला त्यांच्याच घरात जाऊन पराभूत करत नवा इतिहास रचला आहे. न्यूझीलंड आणि बांगलादेश दरम्यान 3 सामन्यांची टी20 मालिका खेळवण्यात येणार आहे. मालिकेतील पहिला सामना आज खेळवण्यात आला आहे.


नेपियरच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या या सामन्यात बांगला देशचा कर्णधार नजमूल हुसेन शांतो याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडला चांगली सुरूवात करता आली नाही. केवळ 1 धाव केली असताना न्यूझीलंडने 3 विकेट्स गमावल्या. मेहंदी हसनने पहिल्याच षटकात टीम सफर्टला तंबूत धाडले. त्याला भोपळाही फोडता आला नाही. यानंतरच्या षटकात शोरीफुल इस्लामने फिन अॅलन आणि ग्लेन फिलीप्सला बाद केले. शोरीफुलने लागोपाठ दोन विकेट्स पटकावत न्यूझीलंडला धक्के दिले. 


नीशमच्या खेळीने न्यूझीलंडचा डाव सावरला (NZ vs BAN)


शोरीफुलने सलग दोन धक्के दिल्यानंतर नीशमने न्यूझीलंडचा डाव सावरला. खराब सुरुवाती झाल्यानंतर डेरल मिचेलने 14 आणि मार्क चॅम्पेनने 19 धावांचे योगदान देत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण मोठी धावसंख्या उभारण्यात त्यांना अपयश आले. दरम्यान, यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या जेम्स नीशमने न्यूझीलंडच्या डावाला उभारी दिली. त्याने 29 चेंडूमध्ये 48 धावांचे योगदान दिले. शिवाय, मिचेल सॅटनर 23 आणि अॅडम मिल्नेने 16 धावांचे योगदान दिले. नीशमच्या 48 धावांच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडला 134 धावा करता आल्या. बांगला देशकडून शोरीफुलने 3, मेहंदी हसन आणि मुस्तफिजूर रहेमानने प्रत्येकी 2 विकेट्स पटकावल्या. तंजीम आणि रिशादने प्रत्येकी 1 विकेट घेतली. 


एकदिवसीय मालिकेत 2-1 न्यूझीलंडने खिशात घातली होती 


3 सामन्यांच्या वनडे मालिकेत न्यूझीलंडने 2-1 ने विजय मिळवला होता. न्यूझीलंडने मालिकेत पहिल्या 2 सामन्यात विजय मिळवला होता. मात्र, तिसऱ्या सामन्यात बांगला देशने न्यूझीलंडला पराभूत केले. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने DLS पद्धतीने 44 धावांनी विजय मिळवला होता


इतर महत्वाच्या बातम्या 


AUS vs PAK : बाबर आझमचा फ्लॉ शो सुरुच, 7 चेंडूत फक्त 1 धाव काढून तंबूत 


K L Rahul Record : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत राहुलचे झुंझार शतक; सचिन आणि कोहलीचा विक्रम मोडला